vainkayya naidu and gopi

भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि अभिनेते सुरेश गोपी (Suresh Gopi) हे राज्यसभेमध्ये (Rajyasabha) आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभे राहिले. सभापती व्यंकय्या नायडूंच्या (Venkaiah Naidu) परवानगीनंतर आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभ्या राहिलेल्या गोपी यांचा नवीन लूक (New Look) पाहून उपराष्ट्रपती गोंधळले.

    देशभरामध्ये कोरोनाचा (Corona) प्रभाव हळूहळू कमी होत असतानाच ३१ मार्चपासून निर्बंध आणखी शिथिल करण्यात येणार आहे. मात्र असं असलं तरी मास्कचं (Mask) बंधन कायम राहणार आहे. कोरोनाचा वेग मंदावला असला तरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रात सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. सभागृहाच्या सदस्यांना मास्क घालूनच प्रवेश दिला जात आहे. मात्र या मास्कमुळे राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) गोंधळल्याचं चित्र नुकतचं राज्यसभेमध्ये (Rajyasabha) पाहायला मिळालं.

    भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि अभिनेते सुरेश गोपी (Suresh Gopi) हे राज्यसभेमध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभे राहिले. सभापती व्यंकय्या नायडूंच्या परवानगीनंतर आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभ्या राहिलेल्या गोपी यांचा नवीन लूक पाहून उपराष्ट्रपती गोंधळले. गोपी यांच्या हनुवटीवर करड्या रंगाचं मास्क आहे की त्यांची दाढी आहे असा प्रश्न उपराष्ट्रपतींना पडला. विशेष म्हणजे थेट माईकवरुनच उपराष्ट्रपतींनी हा प्रश्न विचारला. आपल्या हनुवटीजवळून हात फिरवत, “काय आहे हे ? मास्क की दाढी ?” असा प्रश्न विचारला.

    हा प्रश्न ऐकताच राज्यसभेतील इतर सभासद मोठ्याने हसू लागले. हा हसण्याचा आवाजही व्हायरल झालेल्या (Viral Video)  व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. मात्र सभासद हसत असताना दुसरीकडे हातात काही कागद घेऊन उभे राहिलेल्या गोपी यांनी, “हा माझा नवा लूक आहे सर” असं स्पष्टीकरण दिलं. त्यावर उपराष्ट्रपतींनी हसतच, “ओके” म्हटलं. त्यानंतर गोपी यांनी आपला मुद्दा मांडण्यास सुरुवात केली.

    सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. लाखोंच्या संख्येने या व्हिडिओला व्ह्यूज आहेत. अनेक अकाऊंटवरुन ही काही सेकंदांची क्लीप पोस्ट करण्यात आली आहे.