देशाचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती असूनही जगदीप धनखड यांना मिळत नाही पगार, पण का? तर जाणून घ्या…

सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय, असा प्रश्न जनतेला पडला असेल. उपराष्ट्रपतींचा पगार 'सॅलर अँड अलॉन्सेस ऑफ पार्लमेंट ऑफिसर्स अॅक्ट, 1953' अंतर्गत निर्धारित केला जातो.

  नवी दिल्ली : उपराष्ट्रपती हे भारतातील दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. ते राज्यसभेचे सभापती देखील असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार मिळत नाही. मात्र, इतर सर्व पदांवर पगाराची तरतूद असताना, पण असे का ? हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत असेल, असे का होते? उपराष्ट्रपतींच्या पगाराची तरतूद नाही का? त्यासाठी राज्यघटनेतील नियमांचा थोडा शोध घ्यावा लागेल.

  सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय, असा प्रश्न जनतेला पडला असेल. उपराष्ट्रपतींचा पगार ‘सॅलर अँड अलॉन्सेस ऑफ पार्लमेंट ऑफिसर्स अॅक्ट, 1953’ अंतर्गत निर्धारित केला जातो. उपराष्ट्रपतींना कोणताही पगार मिळत नाही. म्हणजेच या पदासाठी वेतनाची तरतूद नाही. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापतीदेखील आहेत. त्यामुळे सभापती म्हणून त्यांना वेतन आणि सुविधा दिल्या जातात. याशिवाय त्यांना अनेक प्रकारचे भत्तेही मिळतात. निवृत्तीनंतर उपराष्ट्रपतींना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळते.

  इतर कोणत्या सुविधा मिळतात?

  – राहण्यासाठी चांगला बंगला

  – मोफत वैद्यकीय सुविधा

  – मोफत रेल्वे आणि विमान प्रवास

  – लँडलाइन कनेक्शन आणि मोबाईल फोन सुविधा

  – संपूर्ण सुरक्षा आणि पूर्ण कर्मचारी