
आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी (ICICI Bank Loan Scam) सीबीआयने वेणूगोपाल धूत यांना अटक केली आहे.
मुंबई : आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा (ICICI Bank Loan Scam) प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत (Venugopal Dhut) यांना सीबीआयने अटक (CBI Arrest) केली आहे. या प्रकरणातील ही तीसरी अटक आहे. यापुर्वी चंदा कोचर (Chanda Kochar) आणि दिपक कोचर (Deepak Kochar) यांना अटक करण्यात आली आहे. चंदा कोचर या जेव्हा आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ होत्या त्यावेळी व्हिडीओकॉन ग्रुपला नियम डावलून३ हजार २५० कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.
आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा (ICICI Bank Loan Scam) प्रकरणातील मोठी कारवाई करण्यात आली असून आता वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली. धूत यांना थोड्याच वेळात विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांनाही सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात तिन्ही आरोपींना एकत्रपणे हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.