विक्रम लँडरचे नवीन संशोधन समोर; इस्त्रोनं जाहीर केली नवीन माहिती? वैज्ञानिकांनी म्हटलंय की…

गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, जसे की तिथलं तापमान, तिथल्या मातीत असणारे घटक, तिथले फोटो आणि व्हिडीओ मिळत आहेत, दरम्यान, आता प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे नवीन रंगीत फोटो समोर आले आहेत.

    नवी दिल्ली – भारताने २३ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दिवशी भारताने चांद्रयान ३ मोहीम यशस्वी राबवली आहे. तसेच दक्षिण धुव्रावर भारत पोहचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. दरम्यान, चांद्रयान मोहिमेतून (Chandrayaan-3 Update) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्या महिन्यात उतरवलेलं चाद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन सुरु आहे. परंतु, चंद्रावर आता रात्र असल्याने म्हणजेच अंधार पडल्यामुळे इस्रोच्या संशोधनकार्याला छोटासा ब्रेक लागला आहे. परंतू विक्रम लँडरकडून नवीन संशोधन व नवीन माहिती समोर आली आहे. (Vikram Lander’s New Research Revealed; Isro announced new information? Scientists say that)

    रंगीत फोटो आणि व्हिडीओ

    गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, जसे की तिथलं तापमान, तिथल्या मातीत असणारे घटक, तिथले फोटो आणि व्हिडीओ मिळत आहेत, दरम्यान, आता प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे नवीन रंगीत फोटो समोर आले आहेत. आता तर इस्रोने चांद्रयान -3 च्या विक्रम लँडरचे थ्रीडी फोटो जारी केले आहेत. हे फोटो पाहायचे असेल तर थ्रीडी चष्मे घालून पाहा. तरच हे फोटो पाहण्याची खरी मजा येईल, असं इस्रोने म्हटलं आहे.

    डायमेंशनला स्टिरिओय आणि मल्टि व्ह्यू इमेज

    नॅवकॅमचं रुपांतर स्टिरिओमध्ये करण्यात आलं. हे 3 चॅनलवाले फोटो आहेत. खरे तर दोन फोटोंचं हे मिश्रण आहे. एक फोटो रेड चॅलनवर होता. तर दुसरा ब्ल्यू आणि ग्रीन चॅनलवर होता. दोन्हींना मिळून हे फोटो तयार करण्यात आले आहेत. प्रज्ञान रोव्हरने काही दिवसांपूर्वी लँडरच्या 15 मीटर अतंरावर म्हणजे 40 फूट अंतरावरून हे फोटो क्लिक केले होते. इस्रोने विक्रम लँडरच्या आजपासच्या जागेच्या डायमेंशनला स्टिरिओय आणि मल्टि व्ह्यू इमेज म्हणून जारी केले आहे. याला इस्रो एनगलिफ म्हणत आहे. हे फोटो प्रज्ञान रोव्हरच्या नॅवकॅमने घेतले आहेत.