भाजपच्या ‘राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समिती’त विनोद तावडे

राष्ट्रपती निवडणुकीत भाजपशासित राज्यांतील मतांचे योग्य नियोजन करणे, अन्य मित्रपक्ष आणि अपक्ष यांच्या आमदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासह विनोद तावडे आणि सी. टी. रवी या दोन राष्ट्रीय सरचिटणीसांचा समितीत समावेश आहे.

    राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election 2022) भाजपने (BJP) तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाने ‘राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समिती’ (Presidential Election Management Committee) स्थापन केली असून त्यात राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांचा समावेश करण्यात आला आहे.

    राष्ट्रपती निवडणुकीत भाजपशासित राज्यांतील मतांचे योग्य नियोजन करणे, अन्य मित्रपक्ष आणि अपक्ष यांच्या आमदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासह विनोद तावडे आणि सी. टी. रवी या दोन राष्ट्रीय सरचिटणीसांचा समितीत समावेश आहे. तावडे यांच्याकडे समितीचे सहसंयोजकपद सोपवण्यात आले आहे. अन्य पक्षांचे आमदार, खासदार यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची मते भाजपकडे वळवण्याची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्यासोबत तावडे यांच्याकडे असणार आहे.

    राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील नेत्याकडे या प्रकारची मोठी जबाबदारी प्रथमच देण्यात आली आहे. भाजपशासित राज्यांतील आमदार आणि खासदार यांच्या मतांची गोळाबेरीज साधारण ४० ते ४२ टक्के आहे. त्याशिवायची १५ टक्के मते आणण्याची जबाबदारी राजनाथ आणि तावडे यांच्यावर आहे. त्यासाठीच्या भेटीगाठी लवकरच सुरू होतील.