प्रेषितांवर केलेल्या वक्तव्याविरोधात बंगालमध्ये हिंसाचार

    भाजप (BJP) नेत्यांनी प्रेषितांवर केलेल्या वक्तव्याविरोधात बंगाल (Bengal)मध्ये हिंसाचार उसळला. पंचला बाजार भागात पोलिसांची आंदोलकांशी झटापट झाली. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहे.

    शुक्रवारी हिंसाचारा(Violence)विरोधात दुसऱ्या गटाने शनिवार बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर बंगाल भाजप अध्यक्ष सूर्यकांत मुजुमदार यांना हावडा (Howrah) येथील हिंसाचारग्रस्त भागात जाताना अटक करण्यात आली. दरम्यान, बंगाल सरकारने न्यू हावडाचे पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांची बदली केली. हावड्यानंतर मुर्शिदाबादेतही इंटरनेट बंद करण्यात आले आहे.