Viral Video : अग्ग् बाई ही नवरी अशी कशी?  लग्नात अचानक उड्या मारू लागली नवरी ; नवरदेवही झाला हैराण

इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा यांनी आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक लाईक मिळत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अनेक हॅशटॅग देण्यात आले आहेत. अनेकांनी या व्हिडिओ कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    नवी दिल्ली : प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा टप्पा महत्वाचा मानला जातो. यादिवसाचे अनेकांनी स्वप्न पहिले असतात. या दिवशीचे प्रत्येक क्षण स्मरणात राहावेत यासाठी अनेकजण वेगवेगळ्या आयडीयाज आखतात. हा दिवस म्हणजे नवरानावरीसाठी अगदी खास असतोच त्यातच पाहुणेही त्यांना अतिशय खास असल्यासारखंच वागवतात. इतकंच नाही तर लग्नातील पाहुणे नवरी आणि नवरदेवाच्या प्रत्येक लहान-लहान हालचालींवरही नजर ठेवतात. लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या नजरा नवरी-नवरदेवाकडेच लागलेल्या असतात. सध्या सोशल मीडियावर लग्नमंडपातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरी मस्तीच्या मूडमध्ये असून तिचा वेगळा अंदाज पाहून पाहुणेही हसू लागले.

    https://www.instagram.com/reel/CTr1Gu7FEii/?utm_source=ig_embed&ig_rid=4dceb192-2fe6-4305-821a-6a8d43c109c7

    सध्याच्या काळ बदलला आहे. लाजणाऱ्या नवरीचे आता दिवस गेले असून आधुनिक नवऱ्या आपल्या लग्नात होणारे सर्व कार्यक्रम एन्जॉय करताना दिसतात. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.जेव्हा लग्नानंतर पाठवणीची वेळ येते तेव्हा नवरीच्या हातात लाह्या दिल्या जातात. सासरी जाण्याआधी नवरी आपल्या हातानं या लाह्या मागे फेकत असते. मात्र या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी जोराने या लाह्या हवेत फेकते आणि उडी मारते. यानंतर ती जोरजोरानं हसू लागते.

    इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा यांनी आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक लाईक मिळत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अनेक हॅशटॅग देण्यात आले आहेत. अनेकांनी या व्हिडिओ कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.