तेलंगणात दोन दिवसांवरच मतदान; मतदानाच्या पार्श्वभूमीवर 2.5 लाख कर्मचारी तैनात

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी (Telangana Assembly Election) 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानासाठी 2.5 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी निवडणूक ड्युटीवर तैनात करण्यात येणार आहेत.

    हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी (Telangana Assembly Election) 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानासाठी 2.5 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी निवडणूक ड्युटीवर तैनात करण्यात येणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी ही माहिती दिली.

    विकास राज यांनी सांगितले की, जारी केलेल्या 1,68,612 पोस्टल बॅलेटपैकी 26 नोव्हेंबरपर्यंत 96,526 मतदान झाले आहे. या व्यवस्थेत अडीच लाखांपेक्षा अधिक लोक असतील. सुरक्षतेच्या दृष्टीने 45,000 तेलंगणा पोलिस कर्मचारी तैनात असतील. शेजारच्या राज्यांमधून एकूण 23,500 होमगार्ड कर्मचारी मागवण्यात आले आहे. तसेच केंद्रीय दलाच्या 375 कंपन्या मतदानादरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहे.

    राज पुढे म्हणाले, मतदानादरम्यान राज्य विशेष पोलिसांच्या 50 कंपन्या आणि केंद्रीय दलाच्या 375 कंपन्या सुरक्षा व्यवस्था सांभाळतील. ‘होम व्होटिंग’ सुविधेद्वारे 26,660 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी तेलंगणामध्ये सोने, दारू, रोख रक्कम आणि इतर वस्तूंसह 709 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य जप्त केले आहे