
रिझवी यांनी गेले आठ महिने सतत इस्लामचा अनादर केलाय, त्यामुळे आमचा संयम संपला असून आम्ही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
लखनौ, शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी 6 डिसेंबर रोजी हिंदू धर्मात प्रवेश केला. यासोबतच त्यांनी आपलं नाव बदलून जितेंद्र नारायण सिंह त्यागी केलं. रिझवी यांनी धर्म बदलल्यानंतर दोन काँग्रेस नेत्यांनी रिझवींचं शीर धडावेगळं (threatened) करणाऱ्याला 50 लाख आणि 25 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. तेलंगणातील काँग्रेस नेते फिरोझ खान आणि राशीद खान यांनी ही घोषणा केली आहे.
रिझवी यांनी कोणता धर्म स्वीकारला, याबद्दल आम्हाला कोणतीही अडचण नाही कारण ती त्यांची वैयक्तिक निवड आहे. तसेच भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे कोणी कोणताही धर्म स्वीकारू शकतो. मात्र, रिझवी यांनी गेले आठ महिने सतत इस्लामचा अनादर केलाय, त्यामुळे आमचा संयम संपला असून आम्ही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
आठ महिन्यांपूर्वी मी सांगितले होते की जो कोणी वसीम रिझवींचे शीर कापेल त्याला मी 25 लाख रुपये बक्षीस देईन. कारण ते सतत आठ महिने पैगंबरांचा अनादर करीत होते. उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते कोणत्या पक्षाचे एजंट झाले आहेत का?, असा सवाल खान यांनी केला. तसेच ते भारतीय समाजाचे ध्रुवीकरण करीत आहे. मी माझ्या 25 लाख रुपयांच्या बक्षीस घोषणेवर ठाम आहे, असे राशीद खान म्हणाले.