संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

यात मुंबई, काहिरा, बँकॉक, ढाका, जकार्ता, शांघाई, कोपनहेगन, लंडन, लॉस एंजलिस, न्यूयॉर्क, ब्यूनस आयरिस, सँटियागो या सारख्या मोठ्या शहरांना याचा मोठा फटका बसण्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे.

    नवी दिल्ली- वाढत्या वैश्विक तापमानामुळं हिमगन (Snow)वितळत आहेत. त्यामुळे समुद्रातील जलस्तर वाढत चालल्यानं पृथ्वी संकटात (water level in sea is rising) येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याबाबत विश्व मान्सून संघटनेनं दिलेल्या अहवालामुळं खळबल उडाली आहे. या वाढत्या जलस्तराचा परिणाम केवळ छोट्या बेटांवरच होणार नाही, तर समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मुंबईसारख्या शहरांवरही होणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवर मोठी लोकसंख्या असलेल्या शहरांतील अनेकांचे जीव या वाढत्या जलस्तरामुळं धोक्यात येण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यांवर राहणाऱ्या जगातील 90 कोटी माणसांच्या जगण्यावर याचा गंभीर परिणाम होणार अ्सल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

    पृथ्वीवरील 10 पैकी 1 एक संकटात

    या वाढत्या जलस्तराचा परिणाम 10 पैकी एका माणसाच्या असुरक्षिततेवर होणार आहे. यात भारत, बांग्लादेश, चीन यासारख्या मोठ्या देशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. हिमनग वितळणे आणि समुद्रातील जलस्तर वाढणे, याला मानवच जबाबदार असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. या अहवालातील आणखी एका अनुमानानुसार जर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान हे जर 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहिलं तर समुद्राचा जलस्तर येत्या 2000 वर्षांत 2 ते 3 मीटरने वाढेल. जर हे तापमान 2 डिग्री सेल्सिअस राहिलं तर समुद्राचा जलस्तर 6 मीटरनं वाढण्याची शक्यता आहे. आणि जर ग्लोबल वॉर्मिंग 5 डिंग्री सेल्सिअस राहिलं तर समुद्राचा जलस्तर 19 ते 22 मीटरने वाढण्याची शक्यता आहे.

    अर्थव्यवस्था, अन्नसाखळीवरही गंभीर परिणाम

    याचा परिणाम केवळ किनाऱ्यांवरील शहरांवरच होणारा नाही, तर समु्दारीतल लवणता, समुद्रातील जीव यांच्यावरही याचा मोठा दुष्परिणाम होणार आहे. यामुळं जगाची अर्थव्यवस्था, प्रकृती आणि अन्न व्यवस्था यावरही याचा दीर्घकालीन परिणाम होईल.

    कोणकोणत्या शहरांवर होणार परिणाम

    यात मुंबई, काहिरा, बँकॉक, ढाका, जकार्ता, शांघाई, कोपनहेगन, लंडन, लॉस एंजलिस, न्यूयॉर्क, ब्यूनस आयरिस, सँटियागो या सारख्या मोठ्या शहरांना याचा मोठा फटका बसण्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे.