खर्गे व माझ्यात वैचारिक मतभेद नाहीत, आमची लढाई भाजप व आरएसएसशी – शशी थरुर

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी (Congress President Election) होणाऱ्या लढतीत शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यात थेट लढत होणार आहे. खर्गे यांच्यावर आपण टिका केली असं माध्यमात बातम्या चालवल्या आहेत, मात्र आम्हा दोघांमध्ये वैचारिक मतभेद अजिबातच नाहीत. आम्ही एकाच विचारसरणीचे लोक आहोत. असं शशी थरुर (Sashi tharoor) यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    नवी दिल्ली : सध्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (bharat jodo yatra) ही देशभरात यात्रा होत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. यासाठी अध्यक्षपदाची १७ ऑक्‍टोबरची निवडणूक होत आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष पदासाठी (Congress President Election) होणाऱ्या लढतीत शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यात थेट लढत होणार आहे. खर्गे यांच्यावर आपण टिका केली असं माध्यमात बातम्या चालवल्या आहेत, मात्र आम्हा दोघांमध्ये वैचारिक मतभेद अजिबातच नाहीत. आम्ही एकाच विचारसरणीचे लोक आहोत. असं शशी थरुर (sashi tharoor) यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष पदासाठी थरूर विरूद्ध खर्गे असा सामना पाहायला मिळणार आहे. कारण आणखी एका उमेदवाराने देखील अर्ज दाखल केला होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात थेट सामना होणार आहे. दरम्यान, आमची लढाई ही आपपासात नसून, आमची लढाई भाजप व आरएसएसशी असल्याचं शशी थरुर म्हणालेत. आम्हाला एकमेकांशी नाही तर भाजपविरुद्ध लढायचे आहे. आम्ही सत्ताधारी भाजपशी लढताना एकत्र आहोत. असं थरुर म्हणाले. दरम्यान, १७ ऑक्‍टोबरची रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे.