VIDEO! शाब्बास इस्रो! आदित्य एल-1 ची सूर्याच्या दिशेन वाटचाल, 5 वर्षात 15 लाख किलोमीटरचा प्रवास, तर आणखी काय?

सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून PSLV रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.

  श्रीहरिकोटा : भारताने 23 ऑगस्ट रोजी इतिहास घडवला. या दिवशी भारताने चांद्रयान ३ मोहिम यशस्वी राबवत, दक्षिण धुव्रावर पहिल्यांदा पोहचणारा भारत देश ठरला. दरम्यान, भारत आणखी एक मोहिम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला असून, या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 (Aditya L-1 Mission) हे आज सूर्याकडे झेपावले आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून PSLV रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे. (Well done ISRO! Aditya L-1’s journey towards the sun, traveling 15 lakh kilometers in 5 years, what more)


  आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वी

  जगाचे लक्ष लागून राहिलेले ISRO चे Aditya L1 हे यान अवकाशात झेपावले आहे. PSLV-C57 ने अवकाशात झेप घेतली असून त्याची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे. लॉन्चिंगनंतर आदित्य L 1 ने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वी केले आहेत. सामान्यपणे उपग्रहाचा प्रवास सुरु आहे. L1 पॉइंटपर्यंत पोहोचण टेक्निकल दृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे. तिथे पोहोचून त्या कक्षेत पाचवर्ष भ्रमण करणं सोप नाहीय. आदित्य L 2 मध्ये एकूण सात उपकरण आहेत. त्याद्वारे सूर्यावर काय घडतं त्याचा अभ्यास केला जाईल” असं पद्मश्री पुरस्कार विजेते इस्रोचे माजी वैज्ञानिक मयलस्वामी अन्नादुराई यांनी सांगितलं.

  कोणते संशोधन होणार?

  पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे 125 दिवसांचा असेल. त्यामुळं यातून सूर्याच्या अवतीभोवती काय आहे, याचा हे यान अभ्यास करणार आहे. आदित्य-एल1 हे लॅग्रेंज पॉईंट1 वर लाँच केले जाणार आहे. एल 1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचं हे यान जाणार आहे. त्यामुळं या मोहिमेची देखील भारतीयांसह जगातील सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  पाच वर्षात 15 लाख किलोमीटरचा प्रवास…

  आदित्य एल 1 या नावावरुनच या मोहिमेचं उद्देश लक्षात येतो. सूर्याला आदित्य देखील म्हटलं जातं, त्यामुळे आदित्य हे नाव ठेवण्यात आलं. तर एल 1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचं हे यान जाणार आहे. ‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे. यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हे यान पोलार सॅटेलाईट (PSLV-C57) द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे 125 दिवसांचा असेल.