काय सांगता? भारतात पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी होणार स्वस्त, कारण ऐकाल तर तुमचाही बसेल विश्वास…

भारतातील वायदे बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत 6 टक्के घसरण झाल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होणार असल्याचं सांगण्यात येतंय. यावर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 रुपयांची घसरण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

नवी दिल्ली – जगातील मोठ्या बँका (Bank) बुडाल्याचा फायदा आपल्याला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेतील (America) बँका बुडाल्याचा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर झालेला आहे. यात क्रूड ऑईलच्या (Oil) किमती सुमारे 4 टक्क्यांनी घसरल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकी तेलाच्या किमतीत 5 टक्के घट झाली आहे. तर मध्य पूर्वेतील क्रूड तेलाच्या किमतीत 5 टक्के घट झाल्याचं दिसतंय. या सगळ्याचा परिणाम असा आहे की, क्रूड ऑईलचे दर गेल्या सव्वा वर्षांतील किमान पातळीवर आले आहेत. यामुळे भारतातील वायदे बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत 6 टक्के घसरण झाल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होणार असल्याचं सांगण्यात येतंय. यावर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 रुपयांची घसरण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

परदेशी बाजारात कच्च्या तेलाचे दर कोसळले

जगाच्या आर्थिक क्षेत्रात बँकांच्या भूकपांचा फटका कच्च्या तेलाच्या किमतीवर झाल्याचं दिसतयं. क्रूड तेलाचे कधी नव्हे ते 62.70 डॉलर्सपर्यंत खाली घसरण्याचे संकेत मिळतायेत. 2021 नंतर पहिल्यांदाच क्रूड ऑईलचे दर इतके घसरले आहेत. 2022 साली रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात क्रूड ऑईलच्या किंमती कमाल पातळीवर पोहचल्या होत्या.

पेट्रोल स्वस्त होणार का?

भारतातही कच्च्या तेलाच्या किमती पडल्या आहेत. अशी स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्वस्त होऊ शकतील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहेत. सरकार आणि तेल कंपन्यांच्या एकत्रित प्रयत्नानं पेट्रोल-डिझलचे दर 15 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.