chandrayaan 3

चांद्रयान-3 हे मूलतः 2021 मध्ये प्रक्षेपित होणार होते. पण ते दोन वर्षांच्या विलंबाने 2023 मध्ये सुरू करण्यात आले. डिसेंबर 2019 मध्ये, इस्रोने मिशनसाठी 75 कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी मागितला होता.

  गेल्या दिड महिन्यापासून भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान 3 (Chandrayaan-3) चर्चेत आहे. 14 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे यान अंतराळात झेपावलं. तो तेव्हापासून त्याचा आतापर्यंत सुरळीत प्रवास सुरू आहे. आता हे चांद्रयान 23 ऑगस्टला संध्याकाळ चंद्रावर लॅंड होणार आहे. पुर्वीच्या चांद्रयान मोहीमेच्या तुलनेत आताची ही चांद्रयान 3 मोहीम अधिक किफायतशीर असल्याचं म्हण्टलं जात आहे. म्हणजेच आतापर्यंतच्या दोन चांद्रयान मोहिमांच्या तुलनेत चांद्रयान-3 साठी सर्वात कमी पैसा खर्च झाला आहे. पण या चांद्रयान 3 च्या मोहीमेत ऐकूण किती खर्च झाला. या मोहिमेचा नेमका किती बजेट (Chandrayaan-3 Budget) आहे, हे जाणून घ्या.

  चांद्रयान-3 बजेट किती हे जाणून घ्या

  चांद्रयान-3 Chandrayaan-3 Budget) च्या मिशनचे आर्थिक बजेट 615 कोटी रुपये किंवा 75 दशलक्ष डॉलर्स आहे. 2019 मध्ये चांद्रयान-2 मिशन अयशस्वी झाल्यानंतर चांद्रयान-3 मोहीम सुरू करण्यात आली. 2021 मध्येच लॉन्च करण्याची योजना होती. परंतु कोविड महामारीमुळे, त्यास विलंब झाला आणि शेवटी 14 जुलै 2023 चांद्रयान चंद्राच्या दिशेनं झेपावलं. तेव्हापासून संपूर्ण भारत चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची वाट पाहत आहे.

  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. सिवन यांच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान-3 साठी सुमारे 615 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे. जानेवारी 2020 च्या अहवालानुसार, इस्रोचे माजी अध्यक्ष के सिवन यांनी अंतराळ यानाच्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलची किंमत अंदाजे 250 कोटी रुपये असेल आणि प्रक्षेपण सेवेसाठी अतिरिक्त 365 कोटी रुपये खर्च येईल.

  जरी चांद्रयान -3 इतर अंतराळ मोहिमांपेक्षा अधिक किफायतशीर आहे आणि काही हॉलीवूड चित्रपटांचे बजेट देखील आहे. पण शेवटपर्यंत त्याचा एकूण खर्च ६१५ कोटींहून अधिक असू शकतो, असा अंदाज आहे. इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांनी केलेला अंदाज साथीच्या रोगाचा तडाखा बसण्यापूर्वी आणि मिशनच्या आधी तयार करण्यात आला होता.

  2009 साली प्रदर्शित झालेल्या अवतार या हॉलिवूड चित्रपटाचे बजेट आजपर्यंत सुमारे 1970 कोटी रुपये होते. चांद्रयान-3 चे एकूण बजेट सुमारे 615 रुपये आहे. म्हणजेच अवतार चित्रपटाच्या खर्चाच्या केवळ एक तृतीयांश खर्चात चांद्रयान-३ पाठवण्यात भारताला यश आले आहे.

  दोन वर्षाच्या विलंबाने वाढला खर्च

  आता मिशनचे बजेट वाढल्याचा अंदाज आहे. कारण चांद्रयान-3 हे सुरुवातीला 2021 मध्ये प्रक्षेपित होणार होते, परंतु ते दोन वर्षांच्या विलंबाने 2023 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. डिसेंबर 2019 मध्ये, इस्रोने मिशनसाठी 75 कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी मागितला होता. त्यातील ६० कोटी रुपये उपकरणे, यंत्रसामग्री आणि इतर भांडवली खर्चासाठी वापरायचे होते. उर्वरित 15 कोटी रुपये महसुली खर्चासाठी मागितले होते.

  चांद्रयान-2 चे बजेट किती होते?

  जर आपण चांद्रयान-2 मिशनच्या आर्थिक बजेटबद्दल बोललो तर या प्रकल्पावर 978 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये ऑर्बिटर, लँडर, रोव्हर, नेव्हिगेशन आणि ग्राउंड सपोर्ट नेटवर्कवर 603 कोटी रुपये आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलवर 375 कोटी रुपये खर्च करण्यात आले.