rahul gandhi

देशाच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तरेतल्या टोकापर्यंतचा टप्पा पार करणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने 372 लोकसभा मतदारसंघांवर फोकस केला आहे. मात्र यात्रेत चर्चा झाली ती राहुल गांधी यांच्या लूकची.

  राहुल गांधींनी(Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत (Kashmir) 3570 किलोमीटरचा प्रवास केला आहे. श्रीनगरच्या शेर-ए काश्मीर स्टेडियममध्ये आज भारत जोडो यात्रा समाप्त झाली. भारत जोडो यात्रेच्या 146 दिवसांच्या या प्रवासात राहुल यांनी 14 राज्यांमध्ये प्रवेश केला. यात तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी अनेक गोष्टी केल्या.आगामी काळात त्यामुळे राजकारणात फरक पडणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  यात्रेचा उद्देश

  • केंद्रातील एनडीए सरकारच्या काळातील आर्थिक असमानतेला विरोध
  • जाती धर्म, भाषा, रंग इत्यादीवरून वाढत जाणारा भेदभाव आणि गुन्हे यांना विरोध
  • केंद्र सरकारकडून सत्तेचा आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याने त्याला विरोध
  • आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लोकांचा पाठिंबा मिळवणे

  देशाच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तरेतल्या टोकापर्यंतचा टप्पा पार करणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने 372 लोकसभा मतदारसंघांवर फोकस केला आहे. मात्र यात्रेत चर्चा झाली ती राहुल गांधी यांच्या लूकची. कन्याकुमारीमध्ये 7 सप्टेंबरला जेव्हा यात्रेला सुरुवात झाली तेव्हा राहुल यांच्या चेहऱ्यावर थोडीशी दाढी होती. आता पाच महिन्यांनतर त्यांचा चेहरा वेगळाच दिसतोय. मोठी दाढी आणि डोक्यावरचे वाढलेले केस असा त्यांचा आत्ताचा लूक आहे. त्यांच्या पांढऱ्या टी शर्टची खूप चर्चा झाली. कडाक्याच्या थंडीतही ते टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्टवर फिरत होते.

  टफ नेत्याची इमेज – अनेक स्थानिक लोक या भारत जोडो यात्रेमध्ये जोडले गेले.भारत जोडो यात्रा 2 ऑक्टोबरला कर्नाटकातील मैसूर शहरात पोहोचली. दिवसभर चालल्यावर संध्याकाळी जेव्हा भाषणासाठी ते स्टेजवर गेले तेव्हा पाऊस पडायला लागला. मात्र भर पावसातही त्यांनी भाषण सुरुच ठेवलं.

  शेतकऱ्यांना समर्थन – आंध्रप्रदेशात जेव्हा ही यात्रा आली तेव्हा रामलीला सादर करणारे कलाकार यात सामील झाले. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी ते ऊस घेऊन चालताना दिसले.

  महिलांना प्राधान्य – जेव्हा 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधींच्या जन्मदिनी ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचली तेव्हा या यात्रेमध्ये फक्त महिलांचा सहभाग होता. नांदेडपासून बुलढाणा या महाराष्ट्रातील टप्प्यात ते महिला आणि लहान मुलींना भेटले.

  मध्य प्रदेशात काँग्रेस महासचिव प्रियांका गांधीदेखील यात्रेमध्ये सहभागी झाल्या. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील यावेळी उपस्थित होते. खासदार चौधरी यांचं हार्ट अटॅकने निधन झाल्यानंतर राहुलने यात्रा थांबवत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

  जम्मू काश्मीरमध्ये आल्यावर त्यांनी टोपी तर घातली मात्र टी शर्ट तसाच होता. राहुल आणि प्रियांका बर्फात खेळताना दिसले. पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि महासचिव प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत यात्रेची समाप्ती झाली.