राहुल गांधींच्या अटकेचा 2024 लोकसभा निवडणुकांत किती परिणाम? देशातील सर्वात मोठ्या राज्याचा कल काय? सर्व्हे समोर, धक्कादायक लागणार निकाल

दोन्ही विधानसभा निवडणुकांही भाजपानं जिंकून दाखवलेल्या आहेत. आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष भाजपा आघाडी विरुद्ध काँग्रेस-सपा-बसपा असा असणार आहे. देशातील सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात 2024 च्या लोकसभा निवडणुकांत उ. प्रदेशात काय निकाल लातील याचं सर्वेक्षण करण्यात आलंय. त्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

नवी दिल्ली – देशातील राजकीय. वातावरण तापलेलं आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात सूरत (Surat) न्यायालयानं (Court) दिलेल्या २ वर्षांच्या शिक्षेनंतर, त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयानं घेतलाय. यावरुन वातावरण तापलेलं आहे. हा सरकारचा निर्णय भाजपाच्या अंगाशी येईल अशीही चर्चा आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपासह सगळेच पक्ष सध्या तयारीला लागलेले आहेत. देशात सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीत उ. प्रदेशाकडं असणार आहे. उ. प्रदेशात असलेल्या 80 जागांपैकी ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार, त्या पक्षाची सत्ता देशात येणार, हे कायमचं समीकरण आहे. देशाच्या लोकसभेत जाण्याचा मार्ग उ. प्रदेशातून जातो, असं नेहमीच सांगण्यात येतं. 2014 नंतर सगळ्याच निवडणुकांत या ठिकाणी भाजपानं जोरदार कामगिरी केली आहे. दोन्ही विधानसभा निवडणुकांही भाजपानं जिंकून दाखवलेल्या आहेत. आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष भाजपा आघाडी विरुद्ध काँग्रेस-सपा-बसपा असा असणार आहे. देशातील सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात 2024 च्या लोकसभा निवडणुकांत उ. प्रदेशात काय निकाल लातील याचं सर्वेक्षण करण्यात आलंय. त्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

उ. प्रदेशात कोणाला मिळणार बहुमत

एबीपी न्यूज आणि Matrize यांनी एकत्रित लोकसभा निवडणुकांचं सर्वेक्षण उ. प्रदेशात केलं होतं. या सर्व्हेत उ. प्रदेशातील 403 विधानसभा मतदारसंघातील 80 हजार मतदारांची मतं जाणून घेण्यात आलीत. या सर्व्हेत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त झालीये. उ. प्रदेशातील जनतेनं दिलेल्या कौलात 80 पैकी 63 ते 73 जागा या पुन्हा भाजपाला मिळतील, असं समोर आलंय. तर अखिलेश यादव यांच्या सपा आघआडीला 3 ते 6, बसपाला 0 ते 4 आणि काँग्रेसला एक किकंवा दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

काय असेल मतांची टक्केवारी
भाजपा आघाडी- 63 टक्के
सपा आघाडी-19 टक्के
बसपा-11 टक्के
काँग्रेस- 4 टक्के
इतर – 3 टक्के

हा सर्व्हे आश्चर्यकारक का?

2014 पासून उ. प्रदेशात भाजपाची प्रगती होताना दिसते आहे. 2 लोकसभा आणि 2 विधानसभा निवडणुकांत भाजपाला मोठं यश मिळालं होतं. 2022 च्या विधानसभा निवडणुकांत समाजवादी पार्टीनं भाजपासमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. त्यामुळं सपाच्या जागांत वाढ बघायला मिळाली होती. गेली 9 वर्ष सातत्यानं सत्तेत असलेल्या भाजपाच्या विरोधात एन्डी इक्मबन्सी फॅक्टर असेल असंही तज्ज्ञ सांगत होते. मात्र या सर्व्हेत उलट होताना दिसतंय. भाजपाच्या मतांची टक्केवारी 63 टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

2019 साली उ. प्रदेशात कुणाला किती जागा

भाजपा आघाडी- 64
बसपा-10
सपा-आरएलडी-05
काँग्रेस -1

त्यावेळी भाजपाची मतांची टक्केवारी 43.8 टक्के इतकी होती. यावेळी त्यात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.