पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, दरवाढीचं कारण काय? : जाणून घ्या सविस्तर

सोमवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर महागलेल्या क्रूड म्हणजे कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान गेल्या एका महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या दरात 12 टक्के वाढ झाली असून 74 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

  मुंबई : तेल कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. सोमवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर महागलेल्या क्रूड म्हणजे कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान गेल्या एका महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या दरात 12 टक्के वाढ झाली असून 74 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. गेल्या 49 दिवसांत 28 वेळा दरवाढ झाली आहे. 4 मे ते आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 7.1 रुपये प्रती लीटर आणि डिझेल दरात 7.5 रुपये प्रती लीटर वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आज 97.50 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 88.23 रुपये प्रती लीटर दर आहे.

  या कारणामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ 

  आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेल अनेक दिवसांपासून वाढ होत आहे. याच कारणामुळे घरगुती बाजारात इंधनांच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी इंधनाचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांपासून कच्चा तेलाचा भाव डॉलरनुसार ठरवला जातो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर केंद्र आणि राज्य सरकार मोटा टॅक्स वसूल करते.

  दरम्यान यासोबतच इंधनला पेट्रोल पम्पापर्यंत पोहोचवण्याचा खर्च ते डीलरच्या कमिशनपर्यंतचा सगळा बोझा हा सामान्यांवर असतो.  राजधानी दिल्लीत केंद्र सरकार प्रती लीटर पेट्रोलचा दर 34.80 टक्के एक्साइज ड्यूटी आहे. राज्य सरकार 23.08 टक्के टॅक्स घेतात. तर डिढेलबद्दल बोलायचं झालं तर केंद्र सरकारन 37.24 टक्के आणि राज्य सरकार 14.64 टक्के टॅक्स वसूल केला जातो.

  तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलेचा भाव जाणून घ्या

  पेट्रोल-डिझेलचा दर दररोज ठरतो. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर होतात. अगदी घरी मॅसेजवर तुम्ही हे दर जाणून घेऊ शकतात. इंडियन ऑयलचे ग्राहक RSP सोबत शहराचा कोड 9224992249 या नंबरवर पाठवायचा आहे.

  तसेचं 4 मेपासून सतत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे.  यामध्ये मुंबई, रत्‍नागिरी,  औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बंसवाडा, इंदौर, जयपुर, भोपाल, ग्‍वालियर, गुंटुर, ककिनाडा, चिकमंगलुर, शिवमोग्‍गा आणि लेहचा देखील समावेश आहे.