आता काय बोलणार ! आरोग्यमंत्रीच म्हणत आहेत, नवस पूर्ण होताच १०१ बकऱ्यांचा देणार बळी ; जाणून घ्या मुख्यमंत्रीपदाचा अनोखा फॉर्म्युला

रायपूर : छत्तीसगडमध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या फॉर्म्युल्यावरील चर्चेने राजकारण तप्त असतानाच आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांचे एक विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या कथित व्हीडिओत, टी.एस. सिंहदेव आपलेा नवस पूर्ण झाल्यावर देवतेला १०१ बकऱ्यांचा बळी देणार असल्याबबात बोलताना ऐकले जाऊ शकते

रायपूर : छत्तीसगडमध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या फॉर्म्युल्यावरील चर्चेने राजकारण तप्त असतानाच आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांचे एक विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या कथित व्हीडिओत, टी.एस. सिंहदेव आपलेा नवस पूर्ण झाल्यावर देवतेला १०१ बकऱ्यांचा बळी देणार असल्याबबात बोलताना ऐकले जाऊ शकते.सिंहदेव सूरजपूरच्या खोपा गावात फुटबॉल सामन्याच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी दाखल झाले होते. सूरजपूरच्या खोपा गावची ओळख खोपा धामशी आहे. या धामातील भगवंताबद्दल अशी श्रद्धा आहे की बकरीची बळी देण्यास नवस मागितल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात. टी.एस. सिंहदेव १०१ बकऱ्यांचा बळी देण्याचा नवस करताच त्याची राजकीय वर्तुळातही चर्चा होऊ लागली आहे.

मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार

उल्लेखनीय आहे की आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांनी पुढे केलेला ‘अडीच वर्षाचे मुख्यमंत्री’ फॉर्म्युल्याचा मुद्दा अद्यापही थंडावलेला नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी सोपविण्याविषयी चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, गेल्या शनिवारी सूरजपूर भेटीत आरोग्यमंत्री सिंहदे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबबादारी आणि अडीच वर्षे राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारीसारख्या मुद्यावर हात झटकले होते. तथापि नवसाबाबत चर्चा होऊ लागताच पुन्हा एकदा सिंहदेव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.