कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं वाढवली WHO चिंता, विषाणूबद्दल दिली ‘ही’ चेतावणी!

WHO न पुन्हा एकदा कोविड-19 च्या तीन प्रकारांबद्दल चेतावणी दिली आहे. हा वेरियंट त्याला संपूर्ण जगासाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

    सध्या कोरोनाचा (Corona) फारसा प्रभाव दिसत नसला तरीही अनेक देशात हा विषाणू हा पसरला आहे. शक्य तेव्हढी काळजी घेऊन त्याचा प्रभाव कमी करण्यात जरी यश आलं असलं आणि कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत असे आपल्याला वाटत असतानाच त्याचे काही नवीन प्रकार येतात आणि आपल्या प्रतिकारशक्तीवर आणि शरीरावर परिणाम करतात. अशा स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या तीन नवीन प्रकारांबाबत (Corona New Varient) इशारा जारी केला असून त्याला संपूर्ण जगासाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

    Covid-19 चा नवा व्हेरियंट काय आहे?

    मंगळवारी, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरसचे तीन नवीन प्रकार (XXB.1.5, XXB.1.16 आणि EG.5) आणि BA.2.85 सारख्या सहा अंडर-मॉनिटरिंग प्रकारांबद्दल माहिती दिली आणि सांगितले की कोविड -19 चे हे नवीन प्रकार वेगाने पसरत आहेत. जगात पसरत आहेत. त्याचा प्रभाव कमी आहे, परंतु हा विषाणु बराच काळ टिकतो. डब्ल्यूएचओचे प्रमुख वेन केरकोव्ह यांनी सांगितले की, जगभरात 13.5 अब्ज कोविड-19 लस देण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की SARS-CoV-2 आणि इन्फ्लूएन्झा एकत्रितपणे लोकांना होऊ शकत त्यामुळे, ते टाळण्यासाठी लसीकरण करणे खूप महत्वाचे आहे.

    कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांची लक्षणे

    कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराची लक्षणे 2 ते 14 दिवसांनंतर दिसू शकतात. लक्षणे दिसण्यापूर्वीच्या या वेळेला उष्मायन कालावधी म्हणतात आणि या काळात कोविड-19 पसरु शकतो. याला प्रीसिस्टेमॅटिक ट्रान्समिशन म्हणतात. याच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा यांचा समावेश होतो. याशिवाय चव किंवा वास कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, स्नायू दुखणे, थंडी वाजणे, घसा दुखणे किंवा खराब होणे, नाक वाहणे, डोकेदुखी, छातीत दुखणे, डोळे लाल होणे आणि मळमळ होणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत.