
'हिंदुत्वाच्या विचारधारेशी लढण्यासाठी विचारधारांची युती झाली पाहिजे. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी, डावे... विचारधारा खूप महत्त्वाची आहे, पण विचारधारेच्या आधारावर तुमचा आंधळा विश्वास असू शकत नाही. ते म्हणाले, '.. जोपर्यंत वैचारिक समता येत नाही.
नवी दिल्ली- २०१४ पासून देशात भाजपाचा (BJP) विजयीरथ चौफूर उधळू लागला आहे. पहिल्यांदा केंद्रात आणि नंतर हळूहळू देशातील अनेक राज्यात भाजपाने काँग्रेस तसेच प्रमुख विरोधकांना चीतपट करत निवडणुकांत विजयी घौडदौड सुरु केली आहे. दरम्यान, २०१४, २०१९ नंतर आता भाजपा २०२४ च्या देशातील निवडणुकांसाठी मागील काही महिन्यांपासून तयारीला लागला असून, यासाठी रणनीती आखत आहे. देशात भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांकडून (opposition) वेगवेगळी रणनिती आखली जात असली तरी विरोधकांमध्ये एकजूट नसल्याचं दिसून येत आहे, त्यामुळं भाजपाला पराभूत करु शकत नाही. यावर आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी एक मोठ विधान केलं आहे.
काय म्हणाले प्रशांत किशोर?
प्रशांत किशोर म्हणाले की, २०२४ मध्ये विरोधक एकता अस्थिर आणि वैचारिक आधारावर विभागली गेल्याने काम करणार नाही. ते म्हणाले की, विरोधी ऐक्य हा केवळ दिखावा आहे, केवळ पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणून ते साकार होणार नाही. विरोधकांनी लोकांच्या कल्याणासाठी काम करावे लागेल. तसेच त्रिस्तरीय यावर काम करावे लागेल. यातील किमान दोन जागा तुम्हाला भेदता आल्या नाहीत, तर तुम्ही भाजपला आव्हान देऊ शकत नाही, असं किशोर म्हणाले.
विचारधारांची युती पाहिजे
पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, ‘हिंदुत्वाच्या विचारधारेशी लढण्यासाठी विचारधारांची युती झाली पाहिजे. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी, डावे… विचारधारा खूप महत्त्वाची आहे, पण विचारधारेच्या आधारावर तुमचा आंधळा विश्वास असू शकत नाही. ते म्हणाले, ‘.. जोपर्यंत वैचारिक समता येत नाही. तोपर्यंत भाजपाला विरोधक हरवू शकत नाहीत. कारण विरोधकांमध्ये एकजूट फक्त दिखावा आहे, त्यामुळं विरोधक भाजपाला पराभूत करु शकत नाहीत, असं प्रशांत किशोर म्हणाले.