
मागच्या काही दिवसांपूर्वी त्या महिलेने पतीची व्हॉट्सअॅप चॅट पाहिली. ती पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तीला असे काही फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळाले. ज्यावरून तिला तिच्या पतीच्या समलैंगिक संबंधांची माहिती मिळाली.
लग्नानंतर (Marriage) नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यानंतर नवरा बायकोमध्ये होणारे (Husband Wife) वाद काही नवीन नाही. कधी कधी हे वाद इतक्या टोकाला जातात की प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचतं. झारखंडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने तिच्यावर पतीवर विचित्र आरोप लावले आहेत. महिलेने तिच्या पतीवर समलैंगिकतेचा आरोप केला केला मात्र, इतकंच नव्हे तर त्याच्या प्राण्यांशी शारीरिक संबंध असल्याची धक्कादायक आरोपही तिने केला आहे.
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप
तिने पतीवर हुंड्यासाठी छळ आणि मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. रांचीच्या सदर पोलीस स्टेशन परिसरात राहणार्या महिलेने सांगितले की, त्यांचे फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न झाले होते, पण लग्नाच्या एका महिन्यानंतर पतीने हुंड्याची मागणी केली आणि किरकोळ कारणावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. तो तिला मारहाणही करत होता असं तिने म्हण्टलंय.
प्राण्यांसोबत संबंध
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी त्या महिलेने पतीची व्हॉट्सअॅप चॅट पाहिली. ती पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तीला असे काही फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळाले. ज्यावरून तिला तिच्या पतीच्या समलैंगिक संबंधांची माहिती मिळाली. याचबरोबर त्याचे केवळ मित्रांसोबतच नाही तर त्या प्राण्यांशीही संबंध असल्याचेही तिला कळले. याबाबत महिलेने तिच्या पतीला विचारले असता, पतीने तिला दमदाटी करत मारहाण केली. याचबरोबर तुला काय करायचे ते कर माझे कोणीही नुकसान करू शकत नाही, असा थेट इशारा दिला. यानंतर ती महिला न्यायासाठी पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली