लग्नाच्या १० दिवसांनंतरच ८ महिन्याची गरोदर निघाली बायको; नवऱ्याने मारला कपाळावर हात

रुणाचा आधी डॉक्टरांवर विश्वास बसला नाही आणि त्याने पुन्हा चेकअप करण्यास सांगितले, मात्र दुसऱ्यांदाही डॉक्टरांनी तोच प्रकार तरुणाला सांगितला.  त्याचवेळी त्याची बायको ही  ८  महिन्यांची गर्भवती...

  बरेली,  मुलीशी लग्न केल्यानंतर आठवडाभरात ती गर्भवती राहिली तर अशा स्थितीत अनेक प्रश्न निर्माण होतात. मुलीला फक्त लाज वाटत नाही तर तिच्या आई-वडिलांना आणि सासरच्या मंडळींनाही लोकांकडून अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात.

  असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली येथील किल्ल्यातील सराई भागातील आहे, जिथे १० दिवसांपूर्वी नवरीचे लग्न झाले होते आणि हनिमूननंतर ती ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे कुटुंबात खळबळ उडाली.  मुलाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. या प्रकरणी तपासाचे निर्देश देण्यात आले.

  बरेली येथील किल्ल्यातील सराई भागात राहणारा एक तरुण चपलांच्या दुकानात काम करतो. या तरुणाला आपल्या लग्नाची अनेक स्वप्ने होती आणि त्याला आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचे होते. अशा स्थितीत त्याला वस्तीतील मुलगी पसंत पडली. यानंतर दोन्ही घरच्यांच्या संमतीने तरुण आणि तरुणीचा विवाह झाला.

  मात्र लग्नाच्या १० दिवसांनंतर तरुणीच्या पोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्याने तरुणाने महिलेला डॉक्टरांना दाखवले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाला पत्नी ८ महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. डॉ’क्टरांच्या तोंडून तरुणाने हे ऐकताच त्याचे हातपाय सुन्न झाले.

  तरुणाचा आधी डॉक्टरांवर विश्वास बसला नाही आणि त्याने पुन्हा चेकअप करण्यास सांगितले, मात्र दुसऱ्यांदाही डॉक्टरांनी तोच प्रकार तरुणाला सांगितला.  त्याचवेळी त्याची बायको ही  ८  महिन्यांची गर्भवती असल्याची बातमी आजूबाजूच्या लोकांमध्ये आगीसारखी पसरली.

  अशा स्थितीत तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना मोठ्या पेचाचा सामना करावा लागला, त्यानंतर तरुणाने स्वत:सोबत केलेल्या फसवणुकीबाबत मुलीच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, तरुण आणि तरुणीमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसं-बंध होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र तरुणाने याचा नकार दिला.