पत्नी, मुलीचा शिरच्छेद, बिहारमध्ये निर्घृण हत्येनंतर पतीने काढला सेल्फी

पत्नीचे कापलेले डोके घेऊन आरोपी शनिवारी सकाळी आपल्या घरून निघाला (श्रीनगर पोलिस स्टेशन क्षेत्रातील पोखरिया गाव) आणि पत्नीचे आई-वडिल राहतात त्या गावी (सदर पोलीस स्टेशन परिसरातील गोधैला गाव) पोहोचला. पत्नीच्या आई-वडिलांच्या घरापासून २०० मीटर अलिकडे असलेल्या एका पुलावर त्याने तिचे कापलेले डोके ठेवले व पळून गेला. मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या लोकांनी हे डोके पाहिले आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

    नवी दिल्ली – बिहारच्या मधेपुरामध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची घटना घडली. एवढेच नाही तर आरोपीने पत्नीचे छिन्नविछिन्न शीर घेऊन पत्नीचे माहेर गाठले आणि घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या पुलावर शीर ठेवून फरार झाला. शिरासोबत त्याने एक चिठ्ठीही ठेवली. तर मधेपुरा येथील आरोपीच्या घरात पत्नी आणि मुलीचे मृतदेह पडले होते. त्याने मुलीचे शीर टेबलावर ठेवले होते. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे.

    पत्नीचे कापलेले डोके घेऊन आरोपी शनिवारी सकाळी आपल्या घरून निघाला (श्रीनगर पोलिस स्टेशन क्षेत्रातील पोखरिया गाव) आणि पत्नीचे आई-वडिल राहतात त्या गावी (सदर पोलीस स्टेशन परिसरातील गोधैला गाव) पोहोचला. पत्नीच्या आई-वडिलांच्या घरापासून २०० मीटर अलिकडे असलेल्या एका पुलावर त्याने तिचे कापलेले डोके ठेवले व पळून गेला. मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या लोकांनी हे डोके पाहिले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. याठिकाणी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शीर घेऊन आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर घरातील दृश्य पाहून चक्रावून गेले. तेथे मुलीचा मृतदेहही आढळला.

    जिब्राहिल आणि रुक्साना यांचा १२ वर्षांपूर्वी विवाह झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लग्नानंतर त्यांना 3 मुले झाली. दोन मुल ही त्यांच्या मामाच्या घरी शिक्षण घेण्यासाठी राहत होती. तर मुलगी जिब्राहिल आणि रुक्साना यांच्यासोबत राहत होती. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन वारंवार वाद होत होते.