केवळ चहाला उशीर झाला म्हणून बायकोवर तलवारीने वार करून खून; आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन मुलांवरही वार

भोजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फाजलगड गावात एक धक्कादायक घटना घडली. चहा बनवण्यास उशीर झाल्यामुळे रागाच्या भरात एका पतीने पत्नीवर तलवारीने वार करून तिची हत्या केली. आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन मुलांवरही त्याने जीवघेणा हल्ला केला.

    गाझियाबाद : येथील भोजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फाजलगड गावात एक धक्कादायक घटना घडली. चहा बनवण्यास उशीर झाल्यामुळे रागाच्या भरात एका पतीने पत्नीवर तलवारीने वार करून तिची हत्या केली. आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन मुलांवरही त्याने जीवघेणा हल्ला केला. मात्र, यावेळी शेजारी मध्ये आल्याने ते यातून बचावले. नागरिकांनी आरोपी पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    धरमवीर सिंह असे आरोपीचे नाव आहे तर त्याने केलेल्या हल्यात पत्नी सुंदरी देवी हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारमीवर सिंह हा त्याची पत्नी मुलगा सोल्जर, रामवीर उर्फ नानू आणि मुली राखी, सुनीता, लक्ष्मी यांच्यासोबत फाजलगढ येथे राहतो. त्याची मोठी मुलगी राखी हीचे लग्न झाले आहे धरमवीर गावोगावी जाऊन गाडीवर भाजी विकतो. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास सुंदरी देवी आणि पती धरमवीर सिंग हे सकाळी उठले.

    यावेळी धरमवीर सिंह हा भाजीची गाडी तयार करत होता. सुंदरी देवी त्यांच्या घराच्या छतावर बांधलेल्या तात्पुरत्या स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी चहा करायला स्टोव्ह सुरू केला. यावेळी धरमवीर सिंग हाही घराच्या टेरेसवर आला. त्याने सुंदरीसोबत चहा करायला उशीर का केला असा जाब विचारून तिच्याशी वाद घालू लागला. दोघांमध्ये चहा बनवण्यावरून बराच वेळ वाद सरू होता.