तुरुंगात असलेल्या गुन्हेगार पतीसोबत सेक्स करण्याची पत्नीची इच्छा ; न्यायालयाकडे मागितली परवानगी

पतीला गुरुग्राम न्यायालयाने चोरी व खून प्रकरणात दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तिचा पती २०१८ पासून भोंडसी जिल्ह्यात कैद आहे. त्याच्या पतीने वकिलामार्फत न्यायालयात याचिका दाखल करत आपल्याला मूल हवे आहे, त्यासाठी पतीसोबत संबंध ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. महिलेच्या वकिलाने मानवअधिकाराअंतर्गत त्या महिलेला वंशवृद्धीचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.

    खून केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आपल्या पतीसोबत सेक्स करण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका एका महिलेने हरयाणा उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सदर महिलेने आपला वंश वाढविण्यासाठी पतीसोबत संबंध ठेवणे गरजेचे आहे असे त्या महिलेने याचिकेत म्हटले आहे. तिची ही याचिका न्यायालयाने हरयाणाच्या गृहविभागाकडे पाठवली असून त्यावर तत्काळ उत्तर मागवले आहे.

    याचिकाकर्तीच्या पतीला गुरुग्राम न्यायालयाने चोरी व खून प्रकरणात दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तिचा पती २०१८ पासून भोंडसी जिल्ह्यात कैद आहे. त्याच्या पतीने वकिलामार्फत न्यायालयात याचिका दाखल करत आपल्याला मूल हवे आहे, त्यासाठी पतीसोबत संबंध ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. महिलेच्या वकिलाने मानवअधिकाराअंतर्गत त्या महिलेला वंशवृद्धीचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.