Will 2021 be full of catastrophic events? Nostradamus' prediction will not come true, will it? The discussion is over

२०२१ हे वर्ष विनाशकारी घटनांनी भरलेले असणार आहे. २०२१ मध्ये पृथ्वीवर मेंदूत मायक्रोचिप लावलेले सैनिक पाहायला मिळतील. इतकेच नाही तर पृथ्वीला एक लघुग्रहही धडकेल, ज्यामुळे संपूर्ण जगाचा नाश होऊ शकतो. २०२१ मध्ये जगातील काही भागांत मोठा भूकंप होईल, असंही भविष्य नॉस्ट्रेडॅमसने वर्तवलं आहे.

नवी दिल्ली : २०२१ हे वर्ष विनाशकारी घटनांनी भरलेले असेल का? नॉस्ट्रेडॅमसची ‘ती’ भविष्यवाणी खरी तर ठरणार नाही ना? अशा अनेक चर्चांना सध्या उत आले आहे. २०२१ मध्ये जगातील काही भागांत मोठा भूकंप होईल, असंही भविष्य नॉस्ट्रेडॅमसने वर्तवलं आहे.

फ्रेंच भविष्यवक्ता नॉस्ट्रेडॅमसने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यापैकी अनेक खऱ्याही झाल्या आहेत. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर आणि अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांची भविष्यवाणी नॉस्ट्रेडॅमसने केली. ही भविष्यवाणी अचूक ठरली. त्यामुळे त्याने २०२१ च्या विनाबाबत केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेत आली आहे.

२०२१ हे वर्ष विनाशकारी घटनांनी भरलेले असणार आहे. २०२१ मध्ये पृथ्वीवर मेंदूत मायक्रोचिप लावलेले सैनिक पाहायला मिळतील. इतकेच नाही तर पृथ्वीला एक लघुग्रहही धडकेल, ज्यामुळे संपूर्ण जगाचा नाश होऊ शकतो. २०२१ मध्ये जगातील काही भागांत मोठा भूकंप होईल, असंही भविष्य नॉस्ट्रेडॅमसने वर्तवलं आहे.

१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रान्समध्ये नॉस्ट्रेडॅमसनचा जन्म झाला. १५५५ मध्ये श्लोक आणि कवितांच्या माध्यमातून त्याने हजारो भविष्यवाणी केल्या आहेत. त्यातील बऱ्याच खऱ्याही ठरल्या आहेत. नॉस्ट्रेडॅमसने सन ३७९७ पर्यंतचे भविष्य वर्तविले आहे.