प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

रमझानच्या आधी सौदीचे ग्रँड मुफ्ती शेख अब्दुल अजीज अल-अशेख यांनी म्हटलं, की रोजा करताना कोरोनाची लस घेण्यात चुकीचं काहीच नाही. यामुळे रोजा तुटणार नाही. पुढे ते म्हणाले, की या लसीमुळे रोजा असलेल्या व्यक्तीचा रोजा तुटणार नाही.

    नवी दिल्ली : पुढील महिन्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना अर्थात रमझान सुरु होणार आहे. मात्र जगभर कोरोनाने थैमान घातले असताना आता त्याला प्रतिबंधी करणारी लस उपलब्ध झाली आहे. ही कोरोना लस घेतल्यास रोजा तुटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुस्लिम बांधवांमध्ये या गोष्टीबाबत असा समज आहे, की रमझानच्या काळात कोरोना लस घेतल्यास त्यांचा रोजा तुटेल मात्र, सौदी अरेबियातील ग्रँड मुफ्ती यांनी हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

    अरब न्यूजच्या वृत्तानुसार, रमझानच्या आधी सौदीचे ग्रँड मुफ्ती शेख अब्दुल अजीज अल-अशेख यांनी म्हटलं, की रोजा करताना कोरोनाची लस घेण्यात चुकीचं काहीच नाही. यामुळे रोजा तुटणार नाही. पुढे ते म्हणाले, की या लसीमुळे रोजा असलेल्या व्यक्तीचा रोजा तुटणार नाही. कारण, याला फळांचा रस मानलं जात नाही. लस हे खाद्यपदार्थ समजले जात नाही. ही लस शरिराच्या आतमध्ये दिली जात असल्यानं यामुळे रोजा तुटणार नाही.मुफ्ती यांनी दिलेल्या या उत्तरामुळे रोजा आणि लसीबद्दल मनात शंका असणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला आहे.