मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत होणार वाढ; बेकायदेशीर उत्खनन प्रकरण येणार अंगलट?

साहिबगंज बेकायदेशीर उत्खननप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यासह सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआय आणि ईडीकडून सुरू असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणाच्या तपासानंतर आता याच प्रकरणात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

    रांची : साहिबगंज बेकायदेशीर उत्खननप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यासह सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआय आणि ईडीकडून सुरू असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणाच्या तपासानंतर आता याच प्रकरणात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांचे प्रेस सल्लागार अभिषेक प्रसाद पिंटू यांच्यासह 20 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर तीर्थनाथ आकाश आणि अनुरंजन अशोक यांनी हा एफआयआर दाखल केला आहे. झारखंड पोलिसांच्या ऑनलाईन एफआयआर प्रणालीद्वारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिबगंजच्या मुफसिल पोलिस ठाण्यातही माहिती देण्यात आली आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर आता तपासाला सुरुवात होणार आहे.

    पुरावे असल्याचा दावा

    तीर्थनाथ पत्रकारितेशी निगडित असून, ते जल, जंगल, जमीन आणि आदिवासींच्या समस्या मांडत आहेत. तर अनुरंजन अशोक हे पीआयएल निर्माता आहेत. आदिवासींच्या प्रश्नांवर आपले मत व्यक्त करतात. असे अनेक मुद्दे त्यांनी न्यायालयात मांडले आहेत. ज्यांनी गुन्हा दाखल केला. त्यांनी केवळ माहितीपूर्ण माहिती दिली नाही. तर साहिबगंजमध्ये अवैध उत्खनन होत असल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.