
देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या काळात देशवासियांना खरंच देशानं प्रगती केलंय असं वाटतंय का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. देशानं आर्थव्यवस्था, अंतराळ क्षेत्र, कोविड महामारीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी सामान्य जनतेच्या मनात असलेल्या महागाई, बेरोजगारी, विकास या मुद्द्यांवर येत्या 5 वर्षांत प्रगती होईल का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न नुकताच करण्यात आला.
नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या काळात देशवासियांना खरंच देशानं प्रगती केलंय असं वाटतंय का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. देशानं आर्थव्यवस्था, अंतराळ क्षेत्र, कोविड महामारीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी सामान्य जनतेच्या मनात असलेल्या महागाई, बेरोजगारी, विकास या मुद्द्यांवर येत्या 5 वर्षांत प्रगती होईल का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न नुकताच करण्यात आला.
देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं भारतीयांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, हे यातून स्पष्टपणे दिसतंय. देशातील 92 हजार नागरिकांच्या प्रतिक्रिया यात जाणून घेण्यात आल्यात.
जागतिक दबदबा
अर्थव्यवसल्थेला गती देणं हे देशासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचा सूर सगळ्याच भारतीयांनी या सर्व्हेत व्यक्त केला आहे. मात्र देशाची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, येत्या 4 वर्षांत भारताचा दबदबा जगभरात वाढेल, असा आशावाद भारतीयांना वाटतोय.
77 टक्के भारतीय- दबदबा वाढेल
14 टक्के भारतीय- सध्या आहे तीच स्थिती राहील
04 टक्के भारतीय- जागतिक दबदबा कमी होईल
05 टक्के भारतीय – काही सांगता येणार नाही
पुढच्या 5 वर्षांत विकास, समृद्धी वाढेल का?
16 टक्के भारतीय- सर्व नागरिकांचा विकास होईल
39 टक्के भारतीय – अधिक भारतीयांचा विकास होईल
41 टक्के भारतीय- काही जणांचाच विकास
04 टक्के भारतीय- काही सांगता येणार नाही
पुढच्या 5 वर्षांत रोजगार, उद्योग वाढतील का?
33 टक्के भारतीय- देशात रोजगार आणि उद्योगाच्या बऱ्याच संधी
47 टक्के भारतीय- रोजगाराच्या काही संधीच निर्माण होतील.
03 टक्के भारतीय- अशा कोणत्याही नव्या संधी निर्माण होणार नाहीत
10 टक्के भारतीय- रोजगाराच्या संख्येत कमी होईल
07 टक्के भारतीय- काही सांगता येणार नाही
लाचखोरी आणि भ्रष्टाचारात बदल होईल का?
37 टक्के भारतीय- भ्रष्टाचार आणि लाचखोरी कमी होईल
38 टक्के भारतीय- आहे तिच स्थिती कायम राहिल
22 टक्के भारतीय- भ्रष्टाचार आणि लाचखोरी वाढेल
03 टक्के भारतीय- काही सांगता येणार नाही
सामाजिक स्थिरता, बंधुता, शांतता राहील का?
45 टक्के भारतीय- सामाजिक स्थिरता चांगली होईल
31 टक्के भारतीय- सध्याची स्थिती कायम राहील
24 टक्के भारतीय- सध्याची परिस्थिती आणखी बिघडेल
महिला आणि मुलांच्या सुरक्षेचं काय होईल?
52 टक्के भारतीय – सुरक्षा अधिक चांगली होईल
27 टक्के भारतीय- सध्याची स्थिती कायम राहील
17 टक्के भारतीय- सुरक्षेची स्थिती अधिक खराब होईल
04 टक्के भारतीय – काही साांगता येणार नाही