ट्रम्प यांना आज अटक होणार?, पॉर्न अभिनेत्रीला तोंड बंद ठेवायला 1 कोटी;  नेमकं काय आहे प्रकरण?

वर्ष होते 2006. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन टीव्ही चॅनल एनबीसीच्या 'द अप्रेंटिस' या शोमधून खूप प्रसिद्ध झाले होते. 27 जुलै रोजी नेवाडा येथील सेलिब्रिटी गोल्फ टूर्नामेंटमध्ये त्यांनी पहिल्यांदा पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनिएलला पाहिले. त्यावेळी ट्रम्प यांचे वय सुमारे 60 वर्षे होते आणि स्टॉर्मी 27 वर्षांची होती.

एक 60 वर्षांचा श्रीमंत माणूस आणि 27 वर्षांची पॉर्न अभिनेत्री गोल्फ टूर्नामेंट दरम्यान भेटतात. स्पर्धेनंतर, तो श्रीमंत व्यक्ती त्या अभिनेत्रीला त्याच्या हॉटेलच्या खोलीत भेटायला बोलावतो. तो तिला एका टेलिव्हिजन शोमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन देतो आणि अभिनेत्रीचा दावा आहे की दोघे शारीरिक संबंध ठेवतात. नंतर, जेव्हा तो श्रीमंत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवतो तेव्हा तो प्रकरण दाबण्यासाठी अभिनेत्रीला सुमारे 1 कोटी रुपये देतो. हा सारांश अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यातील फास बनला आहे. ट्रम्प यांना 21 मार्चला अटक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिलीच वेळ असेल जेव्हा माजी राष्ट्राध्यक्षांवर फौजदारी खटला दाखल केला जाईल.

वर्ष होते 2006. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन टीव्ही चॅनल एनबीसीच्या ‘द अप्रेंटिस’ या शोमधून खूप प्रसिद्ध झाले होते. 27 जुलै रोजी नेवाडा येथील सेलिब्रिटी गोल्फ टूर्नामेंटमध्ये त्यांनी पहिल्यांदा पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनिएलला पाहिले. त्यावेळी ट्रम्प यांचे वय सुमारे 60 वर्षे होते आणि स्टॉर्मी 27 वर्षांची होती. स्पर्धेनंतर ट्रम्प यांनी स्टॉर्मीला आपल्या हॉटेलच्या खोलीत बोलावले. जेव्हा अभिनेत्री खोलीत पोहोचली तेव्हा ट्रम्प यांनी तिला टीव्हीवर शोमध्ये आणण्याचे आश्वासन दिले. यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. स्टॉर्मी डॅनिएलने 2018 मध्ये ’60 मिनिट्स’ला दिलेल्या मुलाखतीत या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.

डॅनिएल्स सांगते की, 2006 नंतरही डोनाल्ड ट्रम्प तिला वेगवेगळ्या प्रसंगी बोलावत राहिले. 2007 मध्ये, त्यांच्या पहिल्या भेटीच्या एका वर्षानंतर, ट्रम्प यांनी तिला लॉस एंजेलिसमधील बेव्हर्ली हिल्स हॉटेलमधील त्यांच्या बंगल्यावर भेटायला बोलावले. रिअॅलिटी शोमध्ये काम मिळवून देण्यासाठी ट्रम्प यांनी ही भेट घेतली होती असे ती सांगते. यावेळी त्यांनी शारीरिक संबंध ठेवले नाही. त्यानंतर ऑगस्टमध्ये ट्रम्प यांनी फोन केला आणि सांगितले की ते तिला ‘सेलिब्रेटी अप्रेंटिस’ शोमध्ये घेऊ शकणार नाही. यानंतर दोघांची भेट झाली नाही आणि एकमेकांशी बोलणेही बंद केले.

कोण पॉर्न स्टार?

२०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना ट्रम्प यांनी ‘पॉर्न स्टार’ स्टॉर्मी डॅनिएल्स हिला तब्बल १ लाख ३० हजार डॉलर दिल्याचे बोलले जात आहे. स्टॉर्मीने ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधांची वाच्यता करू नये, म्हणून तोंड बंद ठेवण्यासाठी तिला ही रक्कम दिल्याचे सांगितले जात आहे. अर्थात, ट्रम्प यांनी या आरोपांचा इन्कार केला असून स्टॉर्मीच (तिचे खरे नाव स्टिफनी क्लिफोर्ड असे आहे.) ‘ब्लॅक मेल’ करत असल्याचा आरोप ट्रम्प यांच्या वकिलांनी केला आहे. याप्रकरणी मॅनहॅटनचे महाधिवक्ता अल्विन ब्रॅग यांनी आरोपनिश्चिती केल्यानंतर ट्रम्प हे गुन्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरतील.

ट्रम्प यांचे म्हणणे काय?

अद्याप न्यू यॉर्कमधील सरकारी वकिलांमार्फत ट्रम्प यांच्याशी कोणताही संपर्क साधला गेला नसला, तरी आपल्याला मंगळवारी अटक होणार असल्याची आवई ट्रम्प यांनी उठविली आहे. ‘मॅनहॅटनच्या भ्रष्ट सरकारी वकिलांच्या कार्यालयातून माहिती फुटली आहे. गुन्हा सिद्ध होण्याची शक्यता दिसत नसल्याने रिपब्लिकन पक्षातील उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षाला मंगळवारी अटक होणार,’ असा दावा समाजमाध्यमांवर करताना ट्रम्प यांनी, समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही केले आहे. वास्तविक ट्रम्प यांच्यासमोर कायदेशीर पर्यायही उपलब्ध आहेत.