woman hit man with slippers

श्रद्धाच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित महापंचायतीमध्ये (Mahapanchayat) स्टेजवरच हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. स्टेजवर असलेल्या एका महिलेने आपल्या बाजूला उभ्या असलेल्या एका पुरुषाला चप्पलने मारलं.

  दिल्ली : दिल्लीच्या छतरपूर (Chattarpur) भागात श्रद्धाला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता मंचाने महापंचायत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आफताबने ज्या ठिकाणी श्रद्धाची हत्या (Shraddha Walkar Murder Case) केली त्या भागातच या पंचायतीचा कार्यक्रम होता. ‘बेटी बचाओ फाऊंडेशनने’ (Beti Bachao Foundation) ही या महापंचायतीचं समर्थन केलं.

  श्रद्धाच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित या महापंचायतीमध्ये स्टेजवरच हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. स्टेजवर असलेल्या एका महिलेने आपल्या बाजूला उभ्या असलेल्या एका पुरुषाला चप्पलने मारलं. त्यावेळी मंचावर उपस्थित इतर लोकांनी त्या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला.

  मिळालेल्या माहितीनुसार, महापंचायतीमध्ये आपली तक्रार सांगण्यासाठी महिला स्टेजवर आली. जेव्हा एका माणसाने त्यांना धक्का देत माईकपासून दूर हटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेने चप्पल वापरून त्याला मारायला सुरुवात केली. स्टेजवरच्या इतर लोकांनी मग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला.

  श्रद्धा हत्याकांड
  श्रद्धा आणि आफताबमध्ये १८ मे रोजीलग्न करण्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुढचे तीन महिने तो हळूहळू मृतदेहाचे तुकडे जंगलात नेऊन टाकत राहिला. आधी त्याने तिचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटवर माहिती मिळवण्याठी सर्चिंग केलं. दुसऱ्या दिवशी त्याने इलेक्ट्रिक आरी आणली आणि शरीराचे अनेक तुकडे केले. श्रद्धाचे आणि त्याचे रक्ताने माखलेले कपडे कचरा उचलणाऱ्या व्हॅनमध्ये टाकण्यात आले. आफताबने श्रद्धाचे अनेक अंग लपवून कपाटात, स्वयंपाकघरात आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर  पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने इंटरनेटवर सर्च केले. या दरम्यान, अमेरिकन वेबसिरीज डेक्स्टरही सर्च केल्याचं समोर आलं आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. डेक्स्टर या वेबसीरिजवरुन प्रेरणा घेत त्याने हा खून केल्याची माहिती आहे.

  श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर तिचा मृतदेह कुजू नये म्हणून त्याने एक मोठा फ्रिज घेतला. ते सर्व तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. वास येऊ नये म्हणून त्याने परफ्युम, अगरबत्ती यांचा रोज वापर करायचा. नतंर हा आफताबचा दिनक्रमच झाला.