‘महिलांच्या हक्कांचे उल्लंघन’ दिल्ली च्या जामा मशिदीमध्ये महिलांना बंदी

    दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आज प्रसिद्ध जामा मशिदीमध्ये महिलांना एकट्याने किंवा समूहात येण्यावर घातलेल्या निर्बंधाची दखल घेतली आहे. त्यांनी आज जामा मशिदीच्या शाही इमामांना नोटीस जारी केली आहे. मशिदीच्या प्रशासनाने मुख्य गेट्सबाहेर ‘मुलींना’ प्रवेशबंदीच्या नोटिसा लावल्या आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे काहींनी नाराजी बोलून दाखवल्याने, शाही इमामाने नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्यांना हा आदेश लागू नसल्याचे सांगितले आहे.

    शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या म्हणण्यानुसार, जामा मशिद हेरिटेज वास्तूच्या परिसरात काही ‘घटना’ निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. “जामा मशीद हे प्रार्थनास्थळ आहे आणि त्यासाठी लोकांचे स्वागत आहे.

    “अशी कोणत्याही जागा, मग ती मशीद, मंदिर किंवा गुरुद्वारा हे प्रार्थनास्थळ आहे आणि त्यासाठी कोणाला येण्यावर कोणतेही बंधन नाही. आजच 20-25 मुलींच्या गटाने भेट दिली आणि त्यांना प्रवेश करण्यास परवानगी दिली,” असेही बुखारींनी स्पष्ट केले.

     

    दिल्ली महिला आयोगाने मात्र जामा मशिदी बाहेरील पाटी हा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं सांगत इमामांना नोटिस बजावली आहे. त्यांनी उचललेले हे असंवैधानिक पाऊल आहे.