OMG! लग्नाच्या चार वर्षानंतरही मुलबाळ होत नव्हतं, आता महिलेनं दिला एकत्र चार मुलांना जन्म, दोन मुलांसह दोन मुलीचा समावेश

सध्या सर्व मुलांसाह आईला सआदत हॉस्पिटलच्या माता आणि बाल आरोग्य केंद्रात असलेल्या वैद्यकीय युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.

    लग्नानंतर मुलं व्हाव यासाठी अनेक जोडपे प्रयत्न (Baby Planning) करतात. मात्र काही कारणामुळे त्यांना अनेक वर्ष मुलबाळ होत नाही. मात्र, योग्य उपचारानंतर जोडप्याला उशीरा मुलं होण हे अगजी सामान्य बाब आहे. मात्र, राजस्थान मधून काहीसा वेगळा प्रकार समोर आला आहे. टोंकमधील एका महिलेला लग्नाच्या चार वर्षापर्यंत मुलबाळ होत नव्हते. आता तिने एकत्र चार नवजात बालकांना जन्म (Women Gave Birth To Four Children) दिला. सध्या आई आणि चारही मुले निरोगी आहेत. विशेष म्हणजे असे प्रकरण 10 लाखांपैकी एक प्रकरण असल्याचं सांगण्यात येत आहे.

    नेमका प्रकार काय

    राजस्थाच्या टोंकमधील वजीरपुरा गावातील महिलेचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून ती गर्भवती होऊ शकली नाही. मात्र, आता चार मुलं एकत्र असल्यानं कुटुंब आनंदात आहे. समारे  15 वर्षांपूर्वीही असे प्रकरण समोर आले होते. आतापर्यंत या जिल्ह्यात एका महिलेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिल्याची एकूण तीन प्रकरणे समोर आली आहेत.

    चार मुलांना एकत्र जन्म

    रात्री उशिरा महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. त्यानंतर महिलेची प्रसूती झाली. सोमवारी पहाटे ५.५१ वाजता महिलेने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर एक एक करून पुढील चार मिनिटांत आणखी तीन बाळांना जन्म दिला. या चार मुलांपैकी दोन मुले आणि दोन मुली आहेत. चारही बाळांची प्रकृती चांगली आहे

    सध्या सर्व मुलांसाह आईला सआदत हॉस्पिटलच्या माता आणि बाल आरोग्य केंद्रात असलेल्या वैद्यकीय युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. शालिनी यांनी सांगितले की, तपासणीनंतर विवाहित महिलेला गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात तिच्या गर्भाशयात चार गर्भ विकसित होणार असल्याचे सांगण्यात आले. चार महिन्यांनी गर्भपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन किरणच्या गर्भाशयाला विशेष तंत्राने सील करण्यात आले होते की ते केवळ तपासणीच्या वेळीच उघडता येईल.

     10 लाखात एखादं प्रकरण

    वैद्यकीय शास्त्रामध्ये जुळी किंवा तिहेरी मुले एकत्र जन्माला आल्याची प्रकरणे अनेकदा पाहायला मिळतात. पण चार मुले एकत्र जन्माला आल्याची प्रकरणे क्वचितच ऐकायला आणि बघायला मिळतात. डॉक्टर सांगतात की 10 लाख प्रसूतींपैकी फक्त एकच केस चार बाळं एकत्र जन्माला येतात. अनेक प्रकरणांमध्ये, चारपैकी एक किंवा दोन मृत्यू देखील होतात. मात्र या प्रकरणात चारही बाळे निरोगी आहेत.