भारतीय महिलांची हौस लईच भारी ! कॉस्मॅटिकवर तब्बल 5000 कोटींचा खर्च, ऑनलाईन असो की ऑफलाईन खरेदी सुरुच

पैशांची बचत करण्यात भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून भारतीय लोकांचेही हौसेच्या वस्तूंवर खर्च करण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कॉस्मेटिक प्रॉडक्ट (Cosmatic Products) अर्थात सौंदर्य प्रसाधने.

  नवी दिल्ली : पैशांची बचत करण्यात भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून भारतीय लोकांचेही हौसेच्या वस्तूंवर खर्च करण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कॉस्मेटिक प्रॉडक्ट (Cosmatic Products) अर्थात सौंदर्य प्रसाधने. नुकताच भारतीयांच्या खरेदी

  संदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. यात लिपस्टिक, आय लायनर आणि नेल पॉलिश या उत्पादनांची भारतीयांनी फार मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे समोर आले आहे. केवळ ६ महिन्यांमध्ये ५ हजार कोटींहून अधिक रुपये भारतीयांनी विशेषतः महिलांनी सौंदर्य प्रसाधनांवर खर्च केले आहेत.

  कांतार वर्ल्ड पॅनेलच्या एका अभ्यासात ही आकडेवारी समोर आली आहे. सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये ओठांशी संबंधित सौंदर्य प्रसाधने पहिल्या क्रमांकावर आहे. विक्री झालेल्या सौंदर्य प्रसाधनांपैकी ३८ टक्के वाटा हा लिपस्टिकचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर नेल पॉलिश आहे. भारतीयांनी कलर्ड ब्युटी प्रॉडक्टसाठी सहा महिन्यांमध्ये १२१४ कोटी रुपये खर्च केले आहेत.

  भारतीय लोक ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधने खरेदी करतात. यापैकी ४० टक्के खरेदी ऑनलाईन माध्यमातून होते. सौंदर्य प्रसाधने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रामुख्याने नोकरदार महिलांचा समावेश आहे. अनेक वेबसाईटवरील ऑनलाईन सेल, सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या विशेष वेबसाईट्समुळे सौंदर्य प्रसाधनांचा खप वाढला आहे. त्वचेच्या देखभालीसंदर्भात हल्ली महिला फार जागरूक असतात. त्यामुळेच सौंदर्य प्रसाधने वापरण्याचा कल वाढल्याचे पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

  जागरुकतेत वाढ

  सौंदर्य प्रसाधनांसंदर्भातील जागरुकता मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळेच चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिला अधिक पैसे मोजण्यासही तयार असल्याचे हल्ली पाहायला मिळत आहे. 10 शहरांमध्ये लिपस्टिक, नेल पॉलिश आणि आय लायनरसह एकूण दहा कोटींहून अधिक सौंदर्य प्रसाधने विकली गेली आहेत.