Breaking News! ऐतिहासिक निर्णय, लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर; नवीन संसद इमारतीमध्ये पहिल्या विधेयकाला मंजुरी 

    नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात आज ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. ‘नारी शक्ती विधेयक’ असे हे विधेयक म्हणून या विधेयकाचा उल्लेख करण्यात आला आहे. या विधेयकाला मंजुरी देऊन नारी शक्तीचा गौरव करण्यात आला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

    देशाच्या प्रथम पंतप्रधानांपासून ते आताच्या लोकसभेच्या अध्यक्षांपर्यंत अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला. दरम्यान, मोदी मंत्रिमंडळानं (Modi Cabinet) सोमवारी (18 सप्टेंबर) संसदेच्या विशेष अधिवेशनात (Special Session of Parliament) महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) मंजुरी साठी लोकसभेत मांडण्यात येणा आहे, याबाबत आज हे विधेयकाला मंजुरी मिळून सादर होण्याची शक्यता आहे.

    नव्या संसदेत विधेयक मांडले 

    महिला आरक्षण विधेयक 19 सप्टेंबरला म्हणजेच, आज मंगळवारी नव्या संसदेत मांडलं जाऊ शकतं. आज दुपारी एक वाजल्यानंतर हे विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे.