indian air force

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी माहिती दिली आहे की, पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचीही वायुसेनेत भरती करण्यात येणार आहे. यावर्षी वायुसेनेकडून ३००० अग्निवीरांची (Agniveer) भरती करण्यात येणार आहे.

    भारतीय वायुसेनेत (Indian Air Force) आता महिला अग्निवीर (Agniveer) म्हणून दाखल होणार आहेत. याआधी भारतीय नौदल (Indian Navy) आणि लष्करानंतर (Indian Army) आता वायूसेनेत महिला दाखल झाले आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी माहिती दिली आहे की, पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचीही वायुसेनेत भरती करण्यात येणार आहे. यावर्षी वायुसेनेकडून ३००० अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे. वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलांची भरती करण्यापूर्वी आम्हाला सर्व प्राथमिक व पायाभूत सुविधांवर काम करावे लागेल. तसेच महिला सैनिकांना अडचण येऊ नये, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

    भारतीय वायुदलात अधिकारी पदावर महिला आहेत. मात्र एअरमन सैनिक रँकमध्ये महिलांचा समावेश नसल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्यांदाच वायुसेनेत महिला सैनिक म्हणून रुजू होणार आहेत. पुढच्या वर्षी ३५०० अग्निवीरांची भरती होईल तेव्हा ३% महिलांसाठी राखीव असतील. त्यानंतर दरवर्षी त्यात हळूहळू वाढ केली जाईल. चार वर्षांत ती १०% पर्यंत वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढील गोष्टी ठरवल्या जातील.