विनेश फोगाटच्या गंभीर आरोपानंतर कुस्ती महासंघ आणि क्रीडा मंत्रालयाला जाग; “७२ तासांत उत्तर”, अन्यथा…

महासंघाचे काही प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे, असा गंभीर आरोप विनेश फोगाटने बृजभूषण सिंह यांच्यावर केलाय, त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

  नवी दिल्ली- दिल्लीच्या (Delhi) जंतर-मंतरवर कुस्तीपटू विनेश फोगाटसह देशातील अन्य महिला तसेच पुरुष पहिलवान आंदोलनाला बसले आहेत. या सर्वांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. महिला दिल्लीच्या जंतर-मंतरवर कुस्तीपटू विनेश फोगाटसह (Vinesh Phogat) अन्य महिला पहिलवान आंदोलनाला बसले होते. त्यामुळं बृजभूषण सिंह यांच्याविरोधात यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. तसेच क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला काही निर्देश दिले आहेत.

  आम्हाला त्रास देताहेत…

  दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना फोगट म्हणाली की, आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑल्मपिक खेळण्यासाठी जातो, तेव्हा आमच्याकडे ना फिजिओ ना प्रशिक्षक असतो. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आम्हाला धमकावणं सुरु केलं. तसेच प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे, असा गंभीर आरोप विनेश फोगाटने बृजभूषण सिंह यांच्यावर केलाय, त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

  … तर फाशावर लटकवा

  पहिलवानांचा लैगिंक शोषण या गंभीर आरोपानंतर सर्वंत्र खळबळ उडाली असून, यावर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष व खासदार बृजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया विचारली असता, जर या आरोपामध्ये तथ्य आढळले तर, मला भर चौकात फाशी द्या, फाशीला लटकवा असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळं याची दखल आता क्रीय मंत्रालयाने घेतली असून, ७२ तासात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

  ७२ तासांत उत्तर द्या

  भारतीय क्रीडा प्राधिकरणाने सांगितल्यानुसार, “ऑलम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम पदक विजेत्यांसह कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर ७२ तासांत उत्तर द्यावे. असं निर्देश केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला दिले आहेत. तसेच, लखनऊ येथील १८ जानेवारीपासून सुरु होणार महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर रद्द करण्यात आलं आहे. या शिबिरात ४१ पहिलवान १३ प्रशिक्षक सहभागी होणार होते,” अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दिली.