Sanjay Raut's eye will now be on BJP's stronghold Vidarbha, Nagpur will now be the base ....

गेल्या सात आठ वर्षापासून देशात वेगळे राजकारण सुरु आहे. सत्ताधारी व विरोधक शत्रु आहेत तसे वागत आहेत. सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं अशी इच्छा आहे. लोकांच्या समस्येसाठी सत्ताधारी व विरोधकांनी हातात हात घालून काम करणे अपेक्षित आहे, पण दुदैवानं असं चित्र दिसत नाही अशी टिका राऊत यांनी केली.

    नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत माध्यमांना सामोरी जाताना विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच आजापासून संसदेचे दुसऱ्या टप्पातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे, यावर सुद्धा सत्ताधाऱ्यांवर टिका केलीय. गेल्या सात आठ वर्षापासून देशात वेगळे राजकारण सुरु आहे. सत्ताधारी व विरोधक शत्रु आहेत तसे वागत आहेत. सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं अशी इच्छा आहे. लोकांच्या समस्येसाठी सत्ताधारी व विरोधकांनी हातात हात घालून काम करणे अपेक्षित आहे, पण दुदैवानं असं चित्र दिसत नाही अशी टिका राऊत यांनी केली.

    दरम्यान, निवडणुकीला वेगळा रंग दिला जातोय, विजयाचा उन्माद नको व देशात विरोधीपक्ष राहिला पाहिजे. अनेक मुद्दे निवडणुका आधी जिंवत केले जातात, सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे. प्रचारात हिजाब आणि पाकिस्तानासारखे विकासाचे मुद्दे हे दुदैव अशी टिका सुद्धा राऊतांनी भाजपावर केली. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात, गोव्यात कुणीही असले तरी सुद्ध वाद होणारच, फडणवीस यांचे राज्यात मोठे स्वागत झाले, आम्हांला हे बघून आनंद झाला. विश्वजित राणे हे जरी भाजपाच्या तिकिटावर जिंकले तरी त्यांच वैयक्तिक कर्तृत्व मोठे आहे. विजयाचा शिल्पकाराला नोटीस आले असं म्हणणं चुकिचे आहे.

    केंद्रीय तपास यंत्रणांचे लक्ष्य आणि निलेश राणेंवर टिका

    केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रातील नेत्यांना टार्गेट करताहेत, फक्त मविआ नेत्यांवर कारवाई, चौकशी केली जातेय, तपास यंत्रणा लक्ष्य करताहेत. सुडाचे राजकारण होत आहे. शरद पवारांविषयी शंका उपस्थित करताहेत हे गंभीर आहे. कालची पोरं शरद पवारांविषयी बोलताहेत. मी कुणाचे नाव घेणार नाही, हे बोलताहेत हे भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का? त्यांनी पुढे येऊन याविषयी बोलले पाहिजे. पेन ड्राईव्हविषयी तपास सुरु आहे, याचे राजकारण करु नये. लोकांनी रस्त्यावर उतरण चुकीचे आहे, असं म्हणत त्यांनी राणे पिता पुत्रांवर नाव न घेता टिका केली.