योग हा आपल्या जीवनाचा एक मार्ग : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day) कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस (Mysore Palace) मैदानात सामूहिक योग प्रात्याक्षिकेत भाग घेतला. यावेळी त्यांनी योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत योगासनांचे फायदे सांगितले.

    म्हैसूर : म्हैसूरसारख्या अध्यात्मिक केंद्रांनी (Spiritual Center) शतकानुशतके जी योग ऊर्जा जोपासली आहे, ती योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याला दिशा देत आहे. आज योग हा जागतिक सहकार्याचा परस्पर आधार बनत आहे. आज योगामुळे मानवाला निरोगी जीवनाचा विश्वास मिळत असल्याचेही मोदींनी नमूद केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (Yoga Day) कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस (Mysore Palace) मैदानात सामूहिक योग प्रात्याक्षिकेत भाग घेतला. यावेळी त्यांनी योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत योगासनांचे फायदे सांगितले. यावेळी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, योगाला अतिरिक्त काम म्हणून घेण्याची गरज नाही. योग जाणून घ्यायचा आहे, जगायचा आहे, योग साधायचा आहे, योगाचा अंगीकारही करायचा आहे.

    जगातील लोकांसाठी योग हा आज आपल्या जीवनाचा एक भाग आहे, असे नाही तर आता तो जीवनाचा एक मार्ग बनत आहे. ते म्हणाले की, जेव्हा आपण योगासने जगायला सुरुवात करू, तेव्हा योग दिन हे आपल्यासाठी आरोग्य, आनंद आणि शांती साजरे करण्याचे माध्यम बनेल, असेही त्यांनी सांगितले.

    १५ हजार लोकांसोबत योगाभ्यास करण्यापूर्वी पीएम मोदी म्हणाले की, हे संपूर्ण विश्व आपल्या शरीरापासून आणि आत्म्यापासून सुरू होते. विश्वाची सुरुवात आपल्यापासून होते आणि योग आपल्याला आपल्यातील प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देतो. जागृतीची भावना निर्माण करते. आपण कितीही तणावात असलो तरी काही मिनिटांचे ध्यान आपल्याला शांत करते, आपली उत्पादकता वाढवते. योगामुळे आपल्याला शांती मिळते. योगाद्वारे शांती केवळ व्यक्तींनाच मिळते असे नाही. योगामुळे आपल्या समाजात शांतता येते. योगामुळे आपल्या राष्ट्रांना आणि जगाला शांती मिळते आणि योगामुळे आपल्या विश्वात शांतता येते. योग हा आता जागतिक सण बनला आहे. योग हा केवळ एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळेच यावेळी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ची थीम ‘योग फॉर ह्युमॅनिटी’ अशी ठेवण्यात आली आहे. योगाचा हा शाश्वत प्रवास शाश्वत भविष्याच्या दिशेने सुरू राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.