त्याने तिच्याशी मैत्री केली, प्रेम केलं मग लॉजवर नेऊन बलात्कार केला; पुढे झालं असं की…

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी असलेल्या भोपाळ (Bhopal) शहरात एका तरुणाने १६ वर्षीय तरुणीला मैत्री आणि प्रेमाच्या (friendship and love) नावाने फसवलं (Cheated) आहे. या तरुणाने आधी मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं. त्यानंतर लग्नाचं (wedding) आमीष दाखवून शरीर संबंधही (sex) ठेवले. मात्र, नंतर त्याने पाठ फिरवली.

  भोपाळ : प्रेम, मैत्री कुणासोबत करावी? हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. पण आजकालची तरुण पिढी (youngsters) खरंतर खरंच माणसं ओळखण्यात कमी पडत आहे. त्यातूनच त्यांच्यासोबत वाईट घटना घडताना दिसत आहेत. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्याशी दोस्ती (friendship) करतात. आपल्याकडून त्यांना मिळणारा फायदा मिळाला की ते साथ सोडतात. काहीवेळा तर अशी लोकं आपल्याला धोकाही देतात. या धोक्यापासून आपल्याला सावरायला खूप वेळ जातो. यामध्ये आपलं खूप नुकसान होतं. आपला वेळ, पैसा आणि भावनाही त्यात गुंतल्याने आपलं होणारं नुकसान हे जास्त असतं. त्यामुळे अशा लोकांना वेळीच ओळखणं (know the people) जास्त गरजेचं आहे. कारण असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील एका १६ वर्षीय तरुणीसोबत घडला आहे. त्यामुळे तिला प्रचंड मनस्तापाला (vexation) सामोरं जावं लागलं आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात एका तरुणाने १६ वर्षीय तरुणीला मैत्री आणि प्रेमाच्या नावाने फसवलं आहे. या तरुणाने आधी मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं. त्यानंतर लग्नाचं आमीष दाखवून शरीर संबंधही ठेवले. मात्र, नंतर त्याने पाठ फिरवली. आपला मोबाईलच स्विट्च ऑफ केला. या घटनेचा तरुणीला मोठा धक्का बसला आहे. तिने या मानसिक धक्क्यातून लगेच सावरणं थोडं अवघड आहे. पण याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्याही ठोकल्या आहेत.

  रुग्णालयात दोघांची ओळख

  फेब्रवारी महिन्यात पीडित मुलीच्या बहिणीला शहरातील हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे ती तिच्या कुटुंबियांसह रुग्णालयात थांबली होती. यावेळी तिची जावेद नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. या तरुणाच्याही एका नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. ते एकमेकांशी फोनवर बातचित करु लागले.

  आरोपी पीडितेला लॉजवर घेऊन गेला

  दोघांमध्ये जवळीक इतकी वाढली की, जावेद मुलीला २५ फेब्रुवारीला शहरात फिरायला घेऊन गेला. मात्र, तो मुलीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने घोडानक्कास क्षेत्रातील एका लॉजवर घेऊन गेला. तिथे एका खोलीत त्याने अल्पवयीन तरुणीसोबत दुष्कृत्य केलं. मुलीने विरोध केल्यानंतर जावेदने तिला लग्नाचं आमीष दाखवलं. त्यामुळे पीडितेने आपल्या कुटुंबातील कुणालाही सांगितलं नाही. मात्र, या घटनेचा फायदा घेऊन आरोपीने मुलीला जबरदस्तीने दोनवेळा शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

  आरोपीने पीडितेला फसवलं, पोलिसांकडून अटक

  पीडित तरुणी जावेदच्या प्रेमात आकंठ बुडाली असताना त्याने मात्र तिला धोका दिला. जावेदने पीडित मुलीच्या संपर्कात न राहण्यास सुरुवात केली. तो तिला टाळू लागला. तिचा फोन येतो म्हणून त्याने आपला मोबाईलही बंद केला. जावेद सोबत संपर्क करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केल्यानंतरही त्याच्याशी संपर्क न झाल्याने पीडित तरुणी कासावीस झाली. आपल्याला फसवलं गेल्याची जाणीव तिला झाली. त्यानंतर तिने आपल्या भावाला या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिने भावासोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी जावेद विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला लगेच अटकही केली.

  young man first promise of wedding and sexual relation with girl and cheated with her