यूपीतील कौशांबी रेल्वेस्थानकावर सेल्फी घेण्याचा नाद एका तरूणाच्या जीवावर बेतला आहे. फोटो काढण्यासाठी तरुणाने ओएचई (ओव्हर हेड इलेक्ट्रीफिकेशन) खांबाला स्पर्श करताच त्याला हाय होल्टेज करंटचा धक्का बसला आणि त्याच्या शरीराला आग लागली. तर मोठ्याने आवाज होत तारांमध्ये स्पार्क झाल्याने या ठिकाणी मोठा आग भडकली. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पूरमुक्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदार गावातील घटना राहणारा शाहरुख सोमवारी त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. परतत असताना साडेतीनच्या सुमारास प्रयागराज-कानपूर रेल्वे मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मालगाडीच्या ट्रॅकवर त्याने सेल्फी घेण्यास सुरुवात केली. शाहरुख रेल्वे लाईनच्या ओएचईच्या खांबाजवळ पोहोचला आणि सेल्फी घेण्यासाठी त्याने खांब पकडताच त्याला हाय व्होल्टेजचा करंट लागला आणि तो जळू लागला. त्याला जिवंत जळताना पाहून त्याच्या मित्रांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वीज खंडित करण्यात आली. त्यानंतर शाहरुख खांब सोडून खाली पडला आणि त्याला त्रास होऊ लागला. पोलिसांनी माहिती मिळताच जळलेल्या तरुणाला गंभीर अवस्थेत प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात दाखल केले.
शाहरुखचे वडील मुख्तार यांनी सांगितले की, मुलाला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. सकाळी तो मित्रांसोबत मॅच खेळण्यासाठी गावाबाहेरील रेल्वे रूळ ओलांडून गेला. या ठिकाणाहून मुले रोज ये-जा करतात. परत येताना तो सेल्फी कसा काढू लागला त्याला आज कळलं नाही. त्याने पोलला हात लावताच त्याला झटक्याने गंभीररित्या भाजला गेला.