धक्कादायक! तरुणाचे अपहरण करून मुलींकडून बलात्कार

महानगरात एक विचित्र घटना समोर आली असून, त्यात एका तरुणाचे अपहरण करून काही तरुणींनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तरुणाचे अपहरण करून त्याच्यासोबत शरमेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

    जालंधर : महानगरात एक विचित्र घटना समोर आली असून, त्यात एका तरुणाचे अपहरण करून काही तरुणींनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तरुणाचे अपहरण करून त्याच्यासोबत शरमेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

    ही घटना जालंंधर -कपूरथला रोडवरील लेदर कॉम्प्लेक्सजवळ असल्याची माहिती मिळत आहे, जिथे एका तरुणाचे काही मुलींनी अपहरण केले आणि शारीरिक अत्याचार केले. कारखान्यात काम करणाऱ्या पीडित तरुणाने सांगितले की, कारमध्ये उपस्थित असलेल्या ४ मुलींनी त्याला पत्ता विचारला आणि त्याने पत्ता सांगण्यास सुरुवात केली, यादरम्यान त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि त्याला बेशुद्ध केले आणि नंतर शारीरिक अत्याचार केले. त्यांनतर त्याला कार बाहेर टाकून त्या निघून गेल्या. एका वृत्तपत्राने या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी या घटनेबाबत कोणताही पोलिस गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.