पुण्याच्या तेजसने वर्षभरात मागवले तब्बल 28.5 लाखांचे जेवन, भारतीयांनी या वर्षात बिर्याणीवर मारला सर्वात जास्त ताव

अहवालात असे म्हटले आहे की, पुण्याच्या तेजसने 2022 मध्ये एकूण 28 लाख 59 हजार 611 रुपयांची ऑर्डर दिली आहे. दुसरीकडे, दिल्लीच्या अंकुरने दिवसातून 9 वेळा झोमॅटोकडून फूड ऑर्डर केले आणि अशा प्रकारे वर्षभरात 3330 वेळा झोमॅटोकडून फूड ऑर्डर केले.

    पुणे : खाण्यापिण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कुणी धरू शकत नाही. फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने 2022 मध्ये लोकांनी कोणत्या डिशची सर्वात जास्त ऑर्डर दिली होती? याचा डेटा जारी केला आहे. त्यानुसार भारतीयांनी या वर्षात बिर्याणीवर सर्वात जास्त ताव मारल्याचे दिसून आले आहे. तर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2022 मध्ये एका व्यक्तीने तब्बल 28 लाख रुपयांचे फूड ऑर्डर केल्याचे समोर आले आहे.

    आता झोमॅटोच्या खास ग्राहकाबद्दल जाणून घेऊया. अहवालात असे म्हटले आहे की, पुण्याच्या तेजसने 2022 मध्ये एकूण 28 लाख 59 हजार 611 रुपयांची ऑर्डर दिली आहे. दुसरीकडे, दिल्लीच्या अंकुरने दिवसातून 9 वेळा झोमॅटोकडून फूड ऑर्डर केले आणि अशा प्रकारे वर्षभरात 3330 वेळा झोमॅटोकडून फूड ऑर्डर केले. यामुळे अंकुरला सर्वात मोठा फूडी घोषित करण्यात आले आहे. ग्राहक राहुलबद्दल माहिती देताना झोमॅटोने सांगितले की, त्याने 2022 मध्ये 1098 वेळा केक ऑर्डर केला आहे.

    मध्ये दर मिनिटाला बिर्याणीच्या 137 ऑर्डर
    अहवालानुसार, या वर्षी झोमॅटोला ग्राहकांकडून दर मिनिटाला सरासरी 186 बिर्याणी ऑर्डर मिळाल्या आहेत. तर ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रात झोमॅटोशी स्पर्धा करणाऱ्या स्विगी या फूड डिलिव्हरी अॅपलाही इतर पदार्थांपेक्षा सर्वांत जास्त ऑर्डर या बिर्याणीच्या मिळाल्या आहेत. स्विगीला 2022 मध्ये दर मिनिटाला बिर्याणीच्या 137 ऑर्डर मिळाल्याची नोंद आहे. झोमॅटोवर बिर्याणीनंतर पिझ्झा हा दुसरा सर्वात आवडता पदार्थ ठरला आहे.