मिझोरमच्या सर्व 40 जागांचे कल हाती, झोरम पीपल्स मूव्हवेंट आघाडीवर ; भाजपलाही दोन जागा मिळाल्या

मिझोराम निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. आज मतमोजणीत ४० जागांसाठी १७४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पहिल्या झोरम पीपल्स मूव्हवेंट (ZPM) कलामध्ये बहुमत मिळाले आहे. पहिल्या कलात 29 जागांवर आघाडी घेतली आहे. मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) सात तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

    मिझोराम निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. आज मतमोजणीत ४० जागांसाठी १७४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पहिल्या झोरम पीपल्स मूव्हवेंट (ZPM) कलामध्ये बहुमत मिळाले आहे. पहिल्या कलात 29 जागांवर आघाडी घेतली आहे. मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) सात तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्ये झोरम पीपल्स मूव्हवेंट बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मिझो नॅशनल फ्रंटचे किंगमेकर होण्याचं स्वप्न भंगलं आहे.

    राज्यात बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात झोरम पीपल्स मूव्हवेंटने 29 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर मिझो नॅशनल फ्रंटला सात जागांवर आघाडीवर आहे. इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपलाही दोन जागा तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिझोरम नॅशनल फ्रंट, काँग्रेस आणि झोरम पिपल्स मुव्हमेंट (Zoram People’s Movement) या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझो नॅशनल फ्रंट पक्ष आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं चित्र होते. मात्र सुरूवातीचे कल पाहता हे चित्र पूर्ण पलटले असून झोरम पीपल्स मूव्हवेंटला जनतेने कौल दिला आहे.

    मिझोराम निवडणूक: झेडपीएम कोणत्या जागांवर जिंकले?
    झेडपीएम कोलासिब, चालफिल, तवी, ऐझॉल उत्तर-2, ऐझॉल पश्चिम-1, ऐझॉल पश्चिम-2, ऐझॉल पश्चिम-3, ऐझॉल उत्तर-1, ऐझॉल उत्तर-2, ऐझॉल दक्षिण-1, ऐझॉल दक्षिण-2, ऐझॉल दक्षिण-2 3, लेंगटेंग, तुईचांग, ​​चांफई उत्तर, चांफाई दक्षिण, तुईकुम, ह्रंगतुर्जो, दक्षिण तुइपुई, लुंगलेई पूर्व, लुंगलेई पश्चिम, लुंगलेई दक्षिण, लांगतलाई पूर्व.