zydus cadila

झायकोव्ह-डी ही डीएनए कोव्हिड लस आहे. त्यामध्ये जेनेटिक कोड आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता वाढते. झायडस कॅडिलाची तिसऱ्या टप्प्यात २८ हजार स्वयंसेवकावर चाचणी करण्यात आल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी माध्यमांना सांगितले. ही लस जगातील पहिली डीएनए लस असणार आहे. त्यांच्याबाबत आम्हाला अभिमान असल्याचेही पॉल म्हणाले.

    नवी दिल्ली : संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसला प्रतिबंधित करण्यासाठी लसीचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. सध्या भारतात कोविशील्ड, स्फुटनिक आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनंतर देशातील दुसरी स्वदेशी लस लवकरच मिळण्याची चिन्हे आहेत. औषधी कंपनी झायडस कॅडिलाकडून येत्या सात-आठ दिवसांमध्ये झायकोव्ह-डी या लशीच्या आपत्कालीन वापराकरिता (ईयुए) केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात येणार आहे.

    अशी आहे लस
    झायकोव्ह-डी ही डीएनए कोव्हिड लस आहे. त्यामध्ये जेनेटिक कोड आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता वाढते. झायडस कॅडिलाची तिसऱ्या टप्प्यात २८ हजार स्वयंसेवकावर चाचणी करण्यात आल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी माध्यमांना सांगितले. ही लस जगातील पहिली डीएनए लस असणार आहे. त्यांच्याबाबत आम्हाला अभिमान असल्याचेही पॉल म्हणाले.झायडसची लस ही २ ते ८ डिग्री सेल्सियसमध्ये जास्त काळ टिकते. तर २५ डिग्री सेल्सियस तापमानात कमी काळ टिकते.झायडसकडून रेमडॅक (रेमडेसेवीर) आणि विराफीन इंजेक्शनचे कोरोनावरील उपचारासाठी उत्पादन घेण्यात येते. या औषधांच्या पॅकेजवर स्क्रॅचकोड असणार आहे. अशा प्रकारची औषधे ही जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून उत्पादित होणार असल्याचे झायडस कॅडिलाने म्हटले आहे. हे फीचर कंपनीच्या इतर औषधांसाठी वापरण्यात येणार आहे.