सावधान, युद्धांचे प्रकार बदलतायेत

भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पुढची २४ वर्ष म्हणजे १९७१ पर्यंत आपण अनेक पारंपरिक युध्दे लढलो. पण, आत्ताचा काळ हा हायब्रीड वॉरचा आहे. हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे, ज्यात पारंपरिक युद्ध हे राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध आणि मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे.

    1106गेल्या 75 वर्षात संरक्षण क्षेत्रातील बदल, आव्हाने ऊपाय योजना

    सध्या चीनचे भारता  विरुध्द एक नवीन प्रकारचे युध्द चाललेले आहे. त्याला हायब्रीड वॉर किंवा अनरिस्टीकटेड वॉर किंवा अनियमीत युध्द म्ह्णुनओळखले जाते. हे युध्द ३६५ दिवस सुरु असते आणि वेगवेगळ्या स्थरावरती लढले जाते. या युध्दाचा उद्देश आहे भारताच्या जनतेची विचारसरणीच बदली करुन त्यांना चीनी गुलाम बनवणे.

    अनेक पारंपरिक युध्दे लढलो

    भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पुढची 24 वर्ष म्हणजे 1971 पर्यंत आपण अनेक पारंपरिक युध्दे लढलो. जसे, 1947 चे पाकिस्तानशी युध्द एक वर्ष चालले. त्यानंतरचे दुसरे पारंपरिक युध्द  चीनशी 1962 साली झाले, जे आपण चार आठवडे लढलो. त्यानंतरचे तीसरे युध्द 1965 साली पाकिस्तानशी झाले .ते चार आठवडे चालले. शेवटचे पारंपरिक युध्द हे 1971 साली झाले.  हे युध्द तीन आठवडे चालले . या पारंपरिक युध्दामध्ये भारताचे सैन्य हे चीन किंवा पाकिस्तानच्या सैन्याशी लढत होते. या युध्दांशी देशातील जनतेचा युध्दाशी फ़ारसा सबंध नव्हता.

    काराकोरम युध्दाचे तीन भाग

    1971 सालचे युध्द हरल्यानंतर पाकिस्तानला कळाले की, पारंपरिक युध्दात भारताशी लढून जिंकणे शक्य नाही. म्हणून त्यांनी एक नवीन प्रकारचे युध्द 1972 नंतर सुरु केले. ज्याला त्यांनी नाव दिले ‘ऑपरेशन काराकोरम.’

    काराकोरम युध्दाचे तीन भाग होते. काराकोरम एक म्हणजे खालीस्तान, काराकोरम दोन म्हणजे कश्मीरमधे छुपे युध्द किंवा दहशदवाद  आणि काराकोरम तीन म्हणजे देशाच्या इतर भागात दहशदवाद सुरु करायचा. ऑपरेशन काराकोरमची परिस्थिती काय आहे आणि आपण ते कसे लढतो आहे हे समजणे गरजेचे आहे.

    खालीस्तानी दहशतवादाचे कंबरडे मोडले गेले आहे. परंतु, त्याला पुन्हा पुर्नजिवीत करण्याचा प्रयत्न पाकिस्तान कडुन होत आहे. मात्र त्यापेक्षा भयानक अफू, गांजा, चरसचा दहशतवाद ज्याला नार्को टेररिझम  म्हटले जाते,पंजाब आणि सिमावर्ती भागात सुरु आहे .

    आज , पंजाब आणि सिमावर्ती भागातील जवळपास 50 टक्के युवक हे नशेच्या आहारी गेले आहेत. त्यांना कसे वाचवायचे, हे सध्या आपल्या देशासमोरील मोठे आव्हान आहे.

    सध्या पाकिस्तान ड्रोन्सच्या मदतीने पंजाब आणि आणि कश्मीरमधे शस्त्र, दारुगोळा पाठवत आहे. अशी अनेक ड्रोन्स भारतीय सैन्याने पाडली आहेत किंवा पकडली आहेत.मागच्याच महिन्यामधे जम्मू हवाइ दलाच्या बेसवरती पाकिस्तानने ड्रोनच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतू तो आपण हाणून पाडला.

    कश्मीरमधे सुध्दा दहशतवाचे जवळजवळ कंबरडे मोडण्यात आले आहे. लद्दाखमधे दहशतवाद नाहीत .तसेच  जम्मू उधमपुर मधे  देखील दहशतवादी कृत्य होत नाहीत.

    परंतु, कश्मीरच्या खोऱ्यामध्ये आजही दोनशेच्या आसपास दहशतवादी आहेत. भारतीय सैन्य अवीरत ऑपरेशंन्स लॉंच करुन त्यांना मारत असते आणि प्रत्येक आठवड्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याच्या बातम्या माध्यमांत येत असतात.मात्र पाकिस्तानकडे असे दहशतवादी आपल्या सीमेच्या आत घुसवण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे  कश्मीर खोऱ्यात लढाई सुरुच राहणार आहे.

    अंतर्गत सुरक्षेची आव्हाने

    भारताच्या इतर भागात दहशतवादी हल्ले करण्यापासून थांबवण्यामधे आपल्याला नक्कीच यश मिळालेले आहे. परंतु, समुद्री सिमांवरील हल्ले थांबतील याची काही गॅरेंटी नाही. त्यामुळे येत्या काळात आपल्याला आपली सागरी सुरुक्षा अधीक मजबूत करावी लागेल आणि दहशतवादी हल्ले होण्या आधीच  थांबवता आले पाहिजे.

    भारताच्या इतर भागातील दहशतवाद थांबला असला तरी नक्षलवाद किंवा माओवाद  वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. याशिवाय इशान्य भारतातील वेगवेगळ्या वंशीक गटाची जी बंडखोरी होती ती पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न चीन करत आहे.

    बाह्य सुरक्षेची आव्हाने

    भारत पाकिस्तान सीमेवर फायरिंगचा वापर करुन पाकिस्तान दहशतवादी भारतात घुसवण्याचा प्रयत्न करतो. याला आपण चांगले प्रत्युत्तर  देत आहोत.

    परंतु, सध्या एक अतीशय महत्वाची घटना घडत आहे, अफगाणीस्तानमधून अमेरिकी सैन्याची वापसी. यामुळे  अफगाणीस्तानातील सैन्य आणि तालीबान यांच्यात गृहयुध्द सुरु आहे. तालीबानला पाकिस्तान आणि चीन मदत करत आहे. येणाऱ्या काळात या गृहयुध्दाची व्याप्ती अधीक वाढेल. तालिबान सत्तेमध्ये आले तर पाकिस्तान तालिबानच्या मदतीने भारतात दहशतवाद वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. म्ह्णुन दहशतवादाच्या लढाइकरता भारतीय सैन्याला सदैव तयार रहावे लागेल.पाकिस्तान बरोबर पारंपरिक युध्दाची शक्यता सध्या कमी आहे.

    भारताने चीनला लद्दाखमधे चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आणि मागच्या वर्षी झालेल्या गलवानच्या लढाइमधे आपण चीन चे सत्तरहून जास्त सैनीक मारले होते. पहिल्यांदाच चीनी सैन्याचे रक्त भारतीय सीमेवर सांडले गेले.

    चीन ने मागच्या वर्षी 5 मे ला अतिक्रमण केले होते त्या पाच जागांपैकी तीन जागांपासून चीन परत गेलेला आहे. मात्र डेपसांग मधून चीन परत गेलेला नाही. त्यांच्यावर विवीध प्रकारे दबाव टाकून त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. परंतु, याकरता वेळ लागण्याची शक्यता आहे. चीन बरोबर पारंपरिक लढइची आपल्याला चींता नको ,आपल्याला सगळ्यात जास्त चींता आहे ती हायब्रीड वॉरची.

    नविन युध्द अनरिस्टीकटेड वॉर किंवा हायब्रीड वॉर

    2014 नंतर या युध्द लढण्याचे नविन प्रकार सुरु झाला ज्याला अनरिस्टीकटेड वॉर किंवा हायब्रीड वॉर किंवा नियम नसलेले युध्द असे म्हटले जाते.या युध्दामधे चीन वेगवेगळ्या पध्दतीने भारताची आर्थीक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. य़ाचे अनेक पैलु आहेत ज से आर्थीक युध्द किंवा व्यापार युध्द, मानसीक युध्द किंवा प्रोपोगंडा वॉर,सायबर युध्द.सोशल मीडियात घुसखोरी . ‘हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे, ज्यात पारंपरिक युद्ध हे राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध आणि मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘हायब्रिड वॉरफेअर’ मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही, तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या युद्धांत अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात. सतत हे केल्याने सर्वसामान्यांचा विचार बदलू लागतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात असे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे.

    आर्थीक युध्द किंवा व्यापार युध्द

    यात एक महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे चीनचे भारतात केलेली आर्थीक घुसखोरी,आणी भारताशी चाललेले आर्थीक युध्द किंवा व्यापार युध्द . आर्थीक युध्द लढण्याकरता आपण आत्मनिर्भर भारतच्या कार्यक्रमाने चीनची आपल्या आर्थीक व्यवस्थेमधे झालेली घुसखोरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. मेक इन इंडीयाला महत्व देण्याचा प्रयत्न करुन चीन मधून येणाऱ्या गोष्टी भारतात बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. हि लढाइ अनेक वर्ष चालणार आहे. आणि त्यासाठी भारतातील उड्य़ॊग क्षेत्रा्ला आपल्या वस्तुंना जागतीक दर्जाचे बनवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे.

    मानसीक युध्द किंवा प्रोपोगंडा वॉर

    त्याच्या पुढची  लढाइ म्हणजे मानसीक युध्द किंवा प्रोपोगंडा वॉर किंवा दुषप्रचार युध्द. यामधे चीनने भारतात अनेकांना विकत घेतले आहे. त्यांचे हस्तक हे भारताच्या प्रिंट मीडिया, इलेकट्रॉनीक मीडिया, आणि सोशल मीडियावर चीनच्या बाजूने प्रचार करतात. हे युध्द प्रत्येक सामान्य माणसाच्या मोबाईलमध्ये घुसलेले आहे. हे युध्द कसे जिंकायचे? त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनामधे देश भक्ती, देश प्रेमाची भावना जागृत व्हायला पाहिजे. आणि आपण चीनच्या दुषप्रचाराला बळी पडू नये.

    उदाहरणार्थ  लष्करी ताकद भारतापेक्षा खुप जास्त आहे, असे असले तरी चीन भारताशी पारंपरिक युध्द करायला घाबरतो. प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाचे कान आणि डोळे बनलं पाहिजे. भारताचे शत्रु कुठलाही दुषप्रचार करत असतील, मानसीक युध्द करत असतील अशांना शोधून लोकांनी त्यांची माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणेला दिली पाहिजे.

    सायबर युध्द

    चीन आपल्यासोबत सायबर युध्द देखील करत आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे मुंबईतील इलेट्रीसिटी ग्रीडवरती झालेला हल्ला.

    सायबर युध्द जिंकण्याकरीता आपल्याला देशाची सायबर यंत्रणा  अधीक मजबूत करावी लागेल. आणि हे काम सतत सुरु रहाणार आहे. ज्या प्रमाणे आपण आपल्या कॅंप्युटरमधील अॅंटी व्हायरस अपडेट करत असतो त्याच प्रमाणे त्याच प्रमाणे सायबर वॉर पासून वाचण्याकरीता आपल्याला आपल्या देशाची यंत्रणा अपडेट करावी लागणार आहे.

    सोशल मीडियात घुसखोरी

    चीन आपल्या सोशल मीडियात घुसखोरी करतो पण आपण मात्र चीनच्या सोशल मीडियात घुसखोरी करु शकत नाही. कारण सोशल मीडिया चीनी कंट्रोल आहे. त्यामुळे  सोशल मीडियात  त्यांना कसे आव्हान द्यायचे ?.

    अजुन एक युध्द चीनी घातपाताचे युध्द.  आपल्या शेजारी राष्ट्रात नेपाळ किंवा श्रीलंकेत घुसखोरी करुन तिथून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न चीन वारंवार करत आहे. त्यामुळे या सर्वांना प्रत्युत्तर देण्याकरता आपल्याला तयार रहावे लागेल.

    प्रत्येक भारतीय व्यक्ती फ्रंट लाइन सोलजर

    जिथे पारंपरिक युध्दाचा संबंध आहे तिथे भारतीय सीमांचे रक्षण करण्याकरता भारतीय सैन्य नक्कीच सक्षम आहे. मात्रआता प्रत्येक भारतीय व्यक्ती फ्रंट लाइन सोलजर आहे. कारण आत्ताचे युध्द हे बंदुकीने नाही तर सोशल मीडियाच्या आधारे किंवा इलेकट्रॉनीक मीडिया, प्रिंट मीडियाचा वापर करुन आपल्या मनामधे घुसखोरी केले जात आहे. त्यामुळे आपल्या मनात देश भक्ती आणि देश भावना जागृत करुन स्वत:ला देशाच्या बाजूने लढण्यास तयार करणे गरजेचे आहे. आता प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की देशाला सुरक्षीत करण्याकरीता मी काय करु शकतो? आणि तरच या हायब्रीड वॉरमधे आपल्याला यश मिळू शकतो.

    हायब्रीड युद्धाला प्रत्युत्तर

    स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु, अशाप्रकारची ‘ऑपरेशन्स’ आपणसुद्धा चीन आणि पाकिस्तानमध्ये करू शकतो. तुम्ही आमच्या राजकीय पक्षांमध्ये हस्तक्षेप केला, तर आम्हीसुद्धा पाकिस्तानमध्ये असलेले राजकीय पक्ष किंवा पाकिस्तानातील, सिंध, बलुचिस्तान किंवा वजिरिस्तानमधील वेगवेगळ्या मानवधिकार संस्थांशी मिलाप करून त्यांना भारतामध्ये येण्याकरिता निमंत्रण देऊ शकतो. चीनच्या विरुद्ध असलेले काही प्रांत म्हणजे तिबेट, शिनझियांग, हाँगकाँग. इथल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांना आम्ही राजकीय मदत करू शकतो. चीनला जशास तसे हीच भाषा कळते, म्हणून आवडत नसेल तर तुम्ही भारताच्या राजकीय जीवनामध्ये ढवळाढवळ करणे थांबवा. अंतत: प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.

    • ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन