IPL 2021: पराभवानंतर विराट कोहली भावुक ,पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर विराटचे खूप सारे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये विराटला रडू कोसळल्याचं दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराटसेनेकडून दुःख व्यक्त केलं जात आहे.दरम्यान, विराट कोहली ७ वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेलं नाही.

    मुंबई : आयपीएल २०२१ च्या प्लेऑफ सामन्यात विराटच्या आरसीबीचा कोलकात्याने ४ विकेट्सने पराभव केला. या पराभवाबरोबरच बंगळुरुचं यंदाच्या वर्षीही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. शेवटच्या सामन्यात बंगळुरुचा प्रत्येक खेळाडू जीव तोडून खेळला. कोलकाता विरुद्ध झालेल्या या सामन्यानंतर विराट कोहलीचा आयपीएल कर्णधारपदाचा शेवट झाला. या पराभवानंतर विराट कोहली भावुक झाल्याचं पहायला मिळालं.

     

    सध्या सोशल मीडियावर विराटचे खूप सारे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये विराटला रडू कोसळल्याचं दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराटसेनेकडून दुःख व्यक्त केलं जात आहे.दरम्यान, विराट कोहली ७ वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेलं नाही. जाता जाताही ट्रॉफी जिंकण्याचं विराटचं स्वप्न भंगलं आहे. मात्र विराटनं आपण आयपीएलमध्ये आरसीबीकडूनच खेळत राहू आणि याच टीममधून खेळताना निवृत्त होऊ, असं सांगितलं होतं.