IPL वर कोरोनाचं सावट, दोन खेळाडूंना लागण, आजचा सामना पोस्टपोन, नवी नियमावली लागू

कोलकाता संघातील वरूण आणि संदीप या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलीय. त्यामुळे या संघाविरुद्ध मैदानात उतरायला बंगळुरूच्या टीमनं नकार दिलाय. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलत असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिलीय. 

    देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालतेय. नुकतेच एका दिवसांत ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. मात्र आता आयपीएलमध्येदेखील कोरोनाचा शिरकाव झालाय.

    आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार होता. मात्र या सामन्यापूर्वीच दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळं हा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय आयपीएल प्रशासनानं  घेतलाय. खेळाडूंमध्येदेखील आता कोरोना पसरत चालल्याचं दिसून आल्यामुळे खेळाडू आणि व्यवस्थापनाच्या टीममध्ये घबराट पसरलीय.

    कोलकाता संघातील वरूण आणि संदीप या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलीय. त्यामुळे या संघाविरुद्ध मैदानात उतरायला बंगळुरूच्या टीमनं नकार दिलाय. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलत असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिलीय.

    आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २९ सामने खेळवले गेलेत. आजचा हा सामना विशेष असणार होता. फ्रंट लाईन वर्कर्सच्या समर्थनार्थ बंगळुरूचा संघ निळ्या जर्सीसह मैदानात उतरणार होता. मात्र दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आल्याने हा सामना पुढेकलण्यात आलाय. गेल्याच आठवड्यात झम्पा, रिचर्डसन आणि अँड्र्यु टाय हे मायदेशी परत गेलेत. कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आर. अश्विनने स्पर्धेतून माघार घेतलीय. आता आणखी दोन खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे आयपीएलवर कोरोनाचं गडद सावट निर्माण झालंय.