arrested policeman in jalgav

पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला १० हजारांची लाच(10 Thousand Bribe) स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक (Arrest)केली आहे. पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांची ही रुजू झाल्यानंतरची पहिली कारवाई आहे.

    जळगाव : वरणगाव(Varangav) पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळू वाहतूक करणारे डंपर सोडविण्याच्या मागणीसाठी येथील पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला १० हजारांची लाच(10 Thousand Bribe) स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक(Arrest) केली आहे. पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांची ही रुजू झाल्यानंतरची पहिली कारवाई आहे.

    सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, याला तक्रारदार यांच्या मालकीचा डंपर क्रं.एम.एच.४० एन ४०८६ आहे. सदर डंपर वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक करताना त्या वाहनावर करवाई न करण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष १० हजार लाचेची मागणी आरोपी पोलीस उप निरीक्षक सुनिल वाणी (वय-५६) यांनी केली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल गणेश शेळके (वय-३१) यांनी १० हजारांची लाच स्वीकारली. या दोघांना जळगावच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.

    पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक लोधी,स. फौ.दिनेशसिंग पाटील आदींनी ही कारवाई केली .