जळगाव जिल्ह्यात १०९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले; १२ बाधितांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात Swab घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 1093 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  • जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट ७.३६ टक्क्यांवर

जळगाव (Jalgaon). जिल्ह्यात Swab घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 1093 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. आज जिल्ह्यात जळगाव शहर 356 ,जळगाव ग्रामीण 36, भुसावळ 66,अमळनेर 76, चोपडा 100 ,पाचोरा 12, भडगाव 22 ,धरणगाव 70,यावल 43,एरंडोल 55 ,जामनेर 31, रावेर 35,पारोळा 25,चाळीसगाव 95,मुक्ताईनगर 33, बोदवड 33 आणि इतर जिल्ह्यातील 05 असे एकूण 1093 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण 977 बरे झाले असून आतापर्यंत एकूण 68073 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 9977 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 79563 झालेली आहे. जिल्ह्यात आज 12 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1513 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

एरंडोल, पारोळा, धरणगाव तालुक्यात पाच दिवस जनता कर्फ्यु
एरंडोल,पारोळा आणि धरणगाव तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल, पारोळा, धरणगाव तालुका क्षेत्रात 23 मार्च 2021 रोजी पहाटे 1 वाजल्यापासून 27 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये, सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद राहतील.